शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातावेळी ताशी १०० किमी होता मिस्त्री यांच्या गाडीचा वेग, प्राथमिक तपास अहवाल पोलिसांना सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 07:58 IST

मिस्त्री यांच्या कारला रविवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर सूर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह दोघे मृत्युमुखी पडले तर चालक अनाहिता पंडोल आणि त्यांचे पती जबर जखमी झाले.

मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या गाडीला रविवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर अपघात झाला त्यावेळी तिचा वेग ताशी १०० किमी असा होता. अपघाताच्या पाच सेकंदापूर्वी चालक अनाहिता पंडोल यांनी ब्रेक दाबला, असे वाहतूक विभाग आणि मर्सिडिज कंपनी यांच्या प्राथमिक तपास अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. 

मिस्त्री यांच्या कारला रविवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर सूर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह दोघे मृत्युमुखी पडले तर चालक अनाहिता पंडोल आणि त्यांचे पती जबर जखमी झाले. अपघात झाला त्यावेळी कारचा वेग १०० किमी प्रतितास असा होता, असे प्राथमिक तपास अहवालात नमूद आहे. हा अहवाल मर्सिडिज कंपनी आणि वाहतूक विभाग यांनी सोपविला आहे. अपघाताच्या पाच सेकंद आधी पंडोल यांनी ब्रेक दाबला, परंतु त्यामुळे गाडीचा वेग ८९ किमी प्रतितास एवढा खाली आला, याच वेगात असताना कारला अपघात झाल्याचे मर्सिडिज कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, मिस्त्रींच्या अपघातासंदर्भातील कोणताही अहवाल आला नसल्याचे परिवहन विभागाचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. तसेच सेव्ह लाइफ फाऊंडेशननेही कोणताही अहवाल सादर केलेला नाही. 

अपघातग्रस्त गाडी नेणार शोरूममध्ये -- अनाहिता यांनी त्याआधीही ब्रेक दाबला होता का आणि दाबला असल्यास किती वेळा, असा प्रश्न पालघर पोलिसांनी मर्सिडिज कंपनीला विचारला. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी कंपनी १२ सप्टेंबरला अपघातग्रस्त कार शोरूममध्ये नेणार आहे. - तिथे हाँगकाँगहून कंपनीची एक टीम येईल. ती कारचे निरीक्षण करेल. यानंतर सविस्तर अहवाल देण्यात येणार आहे. हाँगकाँगहून येणाऱ्या टीमने भारताच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे. मात्र, ४८ तासांत व्हिसा न मिळाल्यास भारतात असलेली मर्सिडिज कंपनीची टीमच कारचे निरीक्षण करणार आहे.

 चार एअरबॅग्ज उघडल्या -कारला अपघात झाला त्यावेळी चार एअरबॅग्ज उघडल्या होत्या. यापैकी तीन एअरबॅग्ज चालकाच्या समोर आणि एक डोक्याजवळ उघडली. तर एक एअरबॅग चालकाच्या शेजारच्या सीटसमोर उघडली असे वाहतूक विभागाने अहवालात नमूद केले आहे.

पंडोल दाम्पत्याची प्रकृती स्थिर -मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात जबर जखमी झालेल्या डॉ. अनाहिता पंडोल आणि त्यांचे पती डॅरियस पंडोल यांची प्रकृती स्थिर असल्याचे गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. 

गुरुवारी  डॅरियस  पंडोल यांच्या मनगटावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, अनाहिता यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

विविध विषयातील २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पंडोल दाम्पत्यावर उपचार करीत असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातर्फे त्यांच्या उपचाराकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

 

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीAccidentअपघातcarकार