शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपाची ठिणगी शिंदे गट-भाजपातही उडाली; लोकसभेला २२ जागा कशा द्यायच्या, भाजपात कुजबुज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 06:43 IST

लोकसभेच्या २२ जागा आमच्या - शिंदे गट : दावा करण्याचा प्रश्नच नाही, सापत्न वागणुकीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने राज्यातील ४८ पैकी २२ जागांवर दावा सांगितला आहे. लोकसभेच्या २२ जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही, असे शिंदे गटाच्या खासदारांचे म्हणणे आहे.    

२०१९ साली शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावाटप  झाले तेव्हा आम्ही २३ तर भाजपने २५ जागा लढवल्या. यापैकी २३ जागांवर भाजपचे आणि १८ जागांवर आमचे खासदार निवडून आले. आगामी लोकसभा निवडणुकीत हेच सूत्र राहील, असा दावाही खासदार कीर्तिकर यांनी केला आहे. तर गटाचे दुसरे खासदार राहुल शेवाळे यांनीही तसे संकेत दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतरच शिंदे गटाला २२ जागा हव्या आहेत, हा मुद्दा समोर आला.     

कीर्तिकर यांची नाराजी  भाजपकडून शिंदे गटाच्या १३ खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप खा. कीर्तिकर यांनी केला. आमचा शिवसेना पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असल्याप्रमाणेच आमची कामे झाली पाहिजेत. पण भाजपकडून खासदारांना सापत्न वागणूक मिळते, असा आरोप कीर्तिकर यांनी केला आहे. हा मुद्दा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडल्याचेही ते म्हणाले. 

युतीत कोणतीही अडचण नाही. आम्ही समन्वयाने काम करत आहोत. शिवसेना-भाजप युतीत समन्वयाने संपूर्ण काम होईल, सर्व बाबी ठरल्यानंतर तुम्हाला सांगितले जाईल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मागणीवर भाजपच्या भुवया उंचावल्याइतक्या जागा शिंदे गटाला कशा द्यायच्या, अशी कुजबुज भाजपच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी ऐकायला आली. आता भाजप-शिंदे सेनेतही खटके उडण्याची चिन्हे आहेत.   

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGajanan Kirtikarगजानन कीर्तीकरBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस