शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जातेय, फडणवीसांनी राजीनामा द्यावा'; एकनाथ खडसेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 18:35 IST

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून अनेक जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या प्रचारात व्यस्त असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरामध्ये परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे घरे जाळली जात आहे. ठिकठिकाणी एसटी बसची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे मराठा आंदोलनकांवर नियंत्रण मिळवण्यात गृह विभाग अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच संपूर्ण परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही, असं गृहमंत्र्यांनी बजावलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत राज्य सरकार सकारात्मकतेने पावलं उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिलं आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत बांधिल आहे. त्याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. न्या. शिंदे समितीचं काम सुरू असून दुसरीकडे क्युरेटीव्ह पिटीशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयातही आरक्षणावर अभ्यास केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, मराठा समाज बांधवांनी थोडा संयम बाळगला पाहिजे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. राज्यातील हिंसक आंदोलनावर भाष्य करताना, त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात येत आहे. आंदोलनात हिंसाचार घडवण्यासाठी काही समाजकंटक सहभागी होत आहेत, त्यांच्यावर सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना लक्ष ठेवलं पाहिजे, असेही शिंदेंनी म्हटलं.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaratha Reservationमराठा आरक्षण