शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील परिस्थितीवर तातडीने हस्तक्षेप करावा; भाजपाचे राज्यपालांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 13:22 IST

Pravin Darekar's Letter to Bhagat shingh Koshyari: बंडाच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे कोरोना झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. 

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्याच दिवशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बड पुकारले आहे. शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ते आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले आहेत. दिवसेंदिवस शिवसेना आणि अपक्ष आमदार त्यांना जाऊन मिळत आहेत. तर बंडाच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे कोरोना झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. 

यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल कोश्यारींना पत्र लिहिले आहे. राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून अंधाधुंद निर्णय घेतले जात आहेत, जीआर काढले जात आहेत. यामध्ये आपण तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी दरेकर यांनी पत्रातून केली आहे. 

शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांचे शासकीय निवासस्थानही सोडल्याचे माध्यमांतून समजले आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी एका मागोमाग एक असे शासकीय आदेश जारी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ४८ तासांत १६० हून अधिक जीआर जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीज वर्षे एकही निर्णय न घेणारे सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या प्रकारात आपण लक्ष घालावे अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. 

पोलीस बदल्यांचा देखील घाट घातला जात आहे. सरकारचे एक मंत्री भ्रष्टाचारात तुरुंगात गेले आहेत. यामुळे सरकारी निधीचा गैरवापर थांबवावा, अशी मागणी राज्यपालांकडे करत असल्याचे दरेकर यांनी पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना