शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

याच कंपनीच्या विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 07:17 IST

Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या खासगी विमान कंपनीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या तीन वर्षांत  ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात होण्याची ही दुसरी मोठी घटना आहे.

मुंबई -  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या खासगी विमान कंपनीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या तीन वर्षांत  ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात होण्याची ही दुसरी मोठी घटना आहे.

१४ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीचे विमान मुंबई विमानतळावर कोसळले होते. या दुर्घटनेत सहा प्रवासी जखमी झाले होते. या घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले होते, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली होती.

अजूनही अहवाल नाहीधक्कादायक बाब म्हणजे २०२३ मध्ये झालेल्या अपघाताचा अंतिम चौकशी अहवाल अद्याप आलेला नाही, तरीही कंपनीचे कामकाज सुरूच होते. बॉम्बार्डियर लिअरजेट कंपनीचे हे विमान मध्यम आकाराचे बिझनेस जेट म्हणून ओळखले जाते. १९९८ मध्ये आलेले हे विमान हॅनीवेल इंजिनांनी सज्ज असते. मात्र, याच मॉडेलचे विमान सलग दुसऱ्यांदा अपघाताला बळी पडल्याने या विमानांच्या सुरक्षिततेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमानाला उड्डाणास परवानगी कशी दिली? असंख्य त्रुटी असलेल्या या विमानाला उड्डाण करण्याची परवानगी कशी दिली? ती कोणी दिली? डीजीसीए काय करत होते? जुन्या आणि अपघातग्रस्त विमानाला पुन्हा ‘फिटनेस सर्टिफिकेट’ देताना कोणत्या निकषांचा वापर झाला?   ही कंपनी व्हीव्हीआयपींसाठी जुनी, जीर्ण झालेली विमाने वापरत आहे, असा दावा केला जात आहे. कंपनीकडून याबाबत कोणताही प्रतिसाद येत नसून या अपघाताची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

व्हीव्हीआयपी विमान आणि मेंटेनन्सचा मुद्दाअपघातग्रस्त विमान हे अतिशय सुरक्षित मानले जाते. या विमानातून अनेकदा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती प्रवास करत असतात. अशा विमानांची देखभाल संबंधित कंपन्यांकडून अत्यंत काटेकोरपणे केली जाते. शिवाय उपमुख्यमंत्री यातून प्रवास करणार असल्यामुळे त्याची सर्व्हिसिंग झालेलीच असावी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. देखभालीत त्रुटी असण्याची शक्यता कमी असली, तरी तांत्रिक बिघाड पूर्णपणे नाकारता येत नाही. अपघाताचे खरे कारण अहवालानंतरच समोर  येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : VSR Ventures Plane Crash Raises Safety Concerns; Old Planes Used?

Web Summary : Another VSR Ventures plane crashed after a 2023 accident, raising safety questions. Despite a pending accident report, the company continued operations. Concerns arise about using old planes for VIPs and the fitness certificate process.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामती