शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी आक्रमक, पण संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाईच करता येणार नाही? समोर येतंय असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 20:59 IST

Sanjay Raut : संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी अध्यक्षांकडून १५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या हक्कभंगाच्या कारवाईबाबत आता वेगळीच माहिती समोर येत आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्याने आज सत्ताधारी आमदारांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली. विरोधी महाविकास आघाडीमधील नेत्यांनाही संजय राऊतांचं विधान चुकीचं असल्याचं मान्य करावं लागलं. दरम्यान संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी अध्यक्षांकडून १५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मात्र या हक्कभंगाच्या कारवाईबाबत आता वेगळीच माहिती समोर येत आहे.

संजय राऊत यांच्यावर राज्याच्या विधिमंडळातून हक्कभंगाची कारवाईच करता येणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. संजय राऊत हे राज्यसभा सदस्य आहेत. तसेच राज्यसभा सदस्यावर हक्कभंग आणता येत नाही, अशी माहिती विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी दिली आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणून त्यांच्याविरोधात कारवाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून पावले उचलण्यात येत असताना या प्रकरणात पुढे काय निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान,  खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं सत्ताधाऱ्यांनी  थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यानंतर संजय राऊतांवरील हक्कभंगाबाबत दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आज संध्याकाळपासून याबाबत वेगानं पावलं उचलण्यात येत आहेत.

या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून आजच नव्याने हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्षांकडून १५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर या समितीत भाजपाचे आमदार नितेश राणे, अतुल भातखळकर, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. सदर समितीकडून संजय राऊतांना लगेच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येण्याची  शक्यता आहे. त्यानंतर संजय राऊत यांना पुढच्या ४८ तासांत उत्तर द्यावे लागेल, अशी माहिती समोर येत आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVidhan Bhavanविधान भवनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार