शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गड कायम, तर कुठे प्रस्थापितांना दे धक्का; बाजार समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 06:14 IST

जळगाव बाजार समितीत माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला १० जागा मिळाल्या

मुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील निकाल रविवारी लागले. यात प्रस्थापितांनी गड राखले असले  तर काही ठिकाणी दिग्गजांना विजयाने हुलकावणी दिली. जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तर धुळ्यात भाजप खा. डॉ. सुभाष भामरे यांना मतदारांनी धक्का दिला. एकनाथ खडसेंना बोदवड बाजार समिती आपल्याकडे राखण्यात यश आले. 

जळगाव बाजार समितीत माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला १० जागा मिळाल्या. जळगावात धक्का बसलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव बाजार समितीत मात्र वर्चस्व कायम राखले. पाचोरा समिती त्रिशंकू असेल तर अमळनेर मविआ तर यावल समिती भाजप- सेनेकडे गेली आहे. 

कोल्हापुरात आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, विनय कोरे, पी. एन. पाटील आदींच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास’ आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्या. जयसिंगपूरमध्ये सर्वपक्षीय राजर्षी शाहू शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व राहिले. वसईत बहुजन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्ता कायम राखली. 

नांदेडमध्ये महाविकास आघाडीने १७ जागांवर यश मिळवत एकहाती सत्ता मिळवली. हिंगोलीतील जवळा बाजारमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळविला. परभणी जिल्ह्यातील पाथरी व सोनपेठमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने बाजी मारली. बीडच्या माजलगाव बाजार समितीत आ. प्रकाश सोळंके यांच्या गटाने गड राखला. लातूर जिल्ह्यातील दहापैकी ५ महाविकास आघाडीकडे तर ५ बाजार समितीवर भाजपने विजय मिळविला. यवतमाळ जिल्ह्यात शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या सोबतीने बोरीअरबमध्ये सत्ता राखली. झरी, मारेगाव, कळंब, राळेगावमध्ये महाविकास आघाडीने सत्ता मिळविली. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा