शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"जातीय राजकारणाचा पाया रचणाऱ्यांची राजवट आज धुळीला मिळत आहे..."- सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 18:04 IST

...ते सर्व चक्रव्यूह तोडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवाची बाजी लावली. खरे तर ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो. त्या लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत आम्हा दोघांना (सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर) अधिक आहे."

विधानसभा निवडणुकीत महायुतीला अतिप्रचंड यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. तत्पूर्वी, आज पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यानंतर आता सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थाने धुळीला मिळत आहे -सदाभाऊ म्हणाले. "महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा तारणहार, शेतकऱ्यांचा योद्धा, जलनायक, बहुजनांना बरोबर घेऊन जाणारा आणि खेड्यापाड्यातील जनतेला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आता मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभत आहे." यावेळी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधताना सदाभाऊ म्हणाले, "ज्याने या महाराष्ट्रात जातीय राजकाराणाचा पाया रचला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थाने धुळीला मिळत आहे. ती राजवट आज त्यांच्या डोळ्यासमोर, रावणाची सोन्याची लंका जळावी, तशी जळायला लागली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे." तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राम राज्याला सुरुवात  होत आहे. याचा आनंद मला आणि गावगाड्यातील प्रत्येक माणसाला आहे," असेही सदाभाऊ यावेळी म्हणाले.

'त्या' लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत... -"सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, "खरे तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे शिपाई अथवा सैनिक म्हणून मैदानात लढत होतो. जसे अभिमंन्यूला चक्रव्यूहात अडकवले गेले, तेसेच अनेक चक्रव्यूह देवेंद्र फडणवीस यांच्या बोवती तयार करण्यात आलेले होते. ते सर्व चक्रव्यूह तोडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवाची बाजी लावली. खरे तर ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो. त्या लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत आम्हा दोघांना (सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर) अधिक आहे."

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा