शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पाऊस अजून बाकी आहे! मुंबईला यलो अलर्ट तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट

By सचिन लुंगसे | Updated: July 13, 2024 19:04 IST

Maharashtra Rain Update: मुंबईसह राज्यभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, रविवारसाठी मुंबईसह पालघरला यलो अलर्ट, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्हयाला ऑरेंज तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापूर जिल्हयाला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई - मुंबईसह राज्यभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, रविवारसाठी मुंबईसह पालघरला यलो अलर्ट, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्हयाला ऑरेंज तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापूर जिल्हयाला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे आणि नवी मुंबई व लगतच्या परिसराला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार, शनिवारी मुंबईत दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या असून, रविवारीदेखील अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण व घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. रविवारपासून पुढील चार दिवस म्हणजे बुधवारपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. अरबी समुद्रातील ऑफ शोर ट्रफ मजबूत आहे. पण त्याची ऊर्जा मुंबईसह कोकणात व सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील पावसासाठीच खर्ची होत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात अजूनही धिम्या गतीने का होईना सातत्य आहे. दक्षिणेकडील राज्यात वाढणारा अधिक पावसाचा जोर, तेथील पावसाच्या तीव्रता पाहता, महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.- माणिकराव खुळे, हवामान तज्ञ कोणत्या दिवशी कोणते अलर्टरविवारयलो - मुंबई, पालघरऑरेंज - ठाणे, रायगड, पुणेरेड - सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी सोमवारऑरेंज - मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी मंगळवारऑरेंज - पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर बुधवारऑरेंज - रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रkonkanकोकण