शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांच्या स्वायत्ततेला लागणार चाप; सरकारचे सुतोवाच, अतिरेक होत असल्याने राज्यपालांना काही अधिकार देणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 11:19 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्यांद्वारे विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकऱ्या मिळविल्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी मूळ प्रश्न विचारला होता. डॉ. नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, विकास ठाकरे या सदस्यांनी उपप्रश्न विचारले.

मुंबई : राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून विद्यापीठांना स्वायत्तता दिली. पण आता त्याचा अतिरेक होत असल्याने काहीएक नियंत्रण आवश्यक असल्याचे राज्य सरकारचे मत असून विद्यापीठांमधील चौकशी आदींसंदर्भात राज्यपालांना काही अधिकार दिले जातील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. 

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्यांद्वारे विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकऱ्या मिळविल्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी मूळ प्रश्न विचारला होता. डॉ. नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, विकास ठाकरे या सदस्यांनी उपप्रश्न विचारले. इराकच्या दूतावासामार्फत २७ विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला पत्र प्राप्त झाले होते. हे इराकमधील विद्यार्थी आहेत आणि बोगस पदव्यांप्रकरणी त्या देशात या विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. इराकचे काही विद्यार्थी १४ जून २०२३ रोजी नागपुरात आले होते. या २७ विद्यार्थ्यांची विद्यापीठात नोंदणीच नव्हती. त्यांना दिलेली प्रमाणपत्रे ही विद्यापीठाने जारी केलेली नाहीत. या संपूर्ण प्रकरणाची विस्ताराने माहिती नागपुरातील अंबाझरी पोलिस ठाणे, इराकचा दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयालादेखील विद्यापीठाने दिली आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

 या निमित्ताने या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या एका सदस्यावर झालेला अन्याय, चौकशी होऊनही न झालेली कारवाई याकडे नितीन राऊत यांनी लक्ष वेधले. विकास ठाकरे यांनी विद्यापीठात एकेकाळी गाजलेल्या पदवी घोटाळ्याचा उल्लेख केला. 

कायद्यात सुधारणा करणार विद्यापीठाच्या कारभाराबाबतच्या तक्रारींचा धागा पकडून चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारने २०१७ मध्ये विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून विविध प्रकारची स्वायत्तता विद्यापीठांना दिली होती. मात्र, काही बाबतीत आता अतिरेक होत आहे. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंसंदर्भात चौकशीची भूमिका उच्च शिक्षण विभागाने घेतली. त्यावर, त्या कुलगुरू उच्च न्यायालयात गेल्या आणि उच्च न्यायालयाने सरकारलाच फटकारले होते. त्यामुळे चौकशांसारख्या विषयात राज्य सरकार वा विशेषत:  कुलपती म्हणून राज्यपालांना काही अधिकार असले पाहिजेत, या भूमिकेप्रत राज्य सरकार आले असून लवकरच तशी सुधारणा कायद्यात केली जाईल.

टॅग्स :universityविद्यापीठMaharashtraमहाराष्ट्रchandrakant patilचंद्रकांत पाटीलEducationशिक्षण