शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"रांगड्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही", राज ठाकरेंना संताप अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 18:45 IST

Raj Thackeray on Praful Patel NCP: अजित पवारांच्या निधनापासूनच राजकीय पटलवार वेगाने घडामोडी घडण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अध्यक्षपदाचीही चर्चा सुरू झाली. या सगळ्यांवर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. 

Raj Thackeray News: अजित पवारांची राख सावडण्यात आली, त्याच दिवशी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला. त्यानंतर शनिवारीच तातडीने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली, त्यात सुनेत्रा पवारांची गटनेते पदी निवड करून शपथविधी पार पडला. या सगळ्या घडामोडींवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे, त्यावरूनच राज ठाकरेंनी थेट हल्ला केला. 

सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. राज ठाकरेंनी गेल्या दोन दिवसांपासून प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्याकडून ऐन सूतकाच्या काळात सुरू असलेल्या भेटीगाठींवर टीका केली. 

"जे सुरूये त्यावर बोलावंच लागेल"

राज ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल", अशा शब्दात राज ठाकरेंनी सुनावले. 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल पटेल इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावरही राज ठाकरेंनी रोखठोक शब्दात भूमिका मांडली आहे. 

राज ठाकरे प्रफुल पटेलांबद्दल काय बोलले?

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण  पटेल नाही", असे म्हणत राज ठाकरे यांनी थेट प्रफुल पटेल यांच्यावरच हल्ला केला आहे. 

अमोल मिटकरीही म्हणाले, दुर्लक्ष झालं तर दुसरेच राज्य करतात

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी एक महत्त्वाचं आणि मोठं विधान केले. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडली.

आमदार अमोल मिटकरी भूमिका मांडताना म्हणाले की, "दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी माझीही इच्छा आहे. पक्ष एकत्र असायलाच हवा. शरद पवार आणि आम्ही एकत्र असायलाच हवे. पक्ष एकत्र असला म्हणजे दुसरे लोक पक्षात घुसखोरी करणार नाहीत. एवढेच नाही तर स्वराज्य दुर्लक्षित झालं, तर दुसरेच येऊन राज्य करतात", असे विधान त्यांनी केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray opposes Praful Patel as Nationalist Congress Party chief.

Web Summary : Raj Thackeray criticizes the rapid political developments, including Sunetra Pawar's appointment and discussions around Praful Patel becoming NCP president. He insists the NCP president should be Marathi, preferably a Patil, not a Patel.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPraful Patelप्रफुल्ल पटेलSunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण