शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राज्यातील सत्ताप्रयोगाचा महायुतीला होणार त्रास, निवडणुकीआधी नेते महाविकास आघाडीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 07:29 IST

कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल मतदारसंघातील भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत.

मुंबई : राज्यात जून २०२२ मध्ये भाजप-शिंदेसेना सरकार आले आणि नंतरच्या वर्षी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. तीन पक्ष असे एकत्र आल्याने सत्ता तर मिळाली; पण आता पुन्हा सत्ता मिळविताना नेमके तीन पक्षांचे असे एकत्र येणे अडचणीचे ठरू लागले आहे. महायुतीतील नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागायला सुरुवात झाली आहे.  

कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल मतदारसंघातील भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. कारण, तेथे महायुती ही मंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देणार हे उघड आहे. त्यामुळे घाडगे यांना भाजप सोडण्याशिवाय पर्याय नाही, अशी अवस्था आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्ता भरणे आमदार आहेत आणि तिथे भाजपचे गेल्यावेळी पराभूत झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 

तिथे दोघांपैकी एकालाच महायुती संधी देऊ शकणार असल्याने इंदापूरही कागलच्या वाटेवर जाईल, अशी चिन्हे आहेत. लातूर जिल्ह्यातील उद्गीरचे आमदार व राज्याचे मंत्री संजय बनसोडे यांना महायुतीची उमेदवारी मिळणार हे लक्षात आल्याने माजी आमदार व भाजपचे नेते सुधाकर भालेराव आधीच शरद पवार गटात गेले आहेत. रामटेक मतदारसंघातील अपक्ष व शिंदेसमर्थक आमदार आशिष जयस्वाल यांना महायुतीने उमेदवारी दिल्यास तेथील भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी बंडाच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते.

दहा मतदारसंघांमध्ये राजकीय पेच   गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमध्ये गेल्यावेळी केवळ ८१८ मतांनी पराभूत झालेले माजी मंत्री भाजपचे राजकुमार बडोले यांच्यासमोरही राजकीय भवितव्याचा प्रश्न आहे. कारण, तेथे अजित पवार गटाचे मनोहर चंद्रिकापुरे आमदार आहेत.  बडनेरा (जि. अमरावती) येथे अपक्ष आमदार रवी राणा हे भाजपसोबत आहेत. तिथे भाजपचे आ. श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांनी कोणत्याही परिस्थितीत लढणारच, असा पवित्रा घेतला आहे. अशा आणखी किमान दहा मतदारसंघांमध्ये महायुतीसमोर असा पेच राहील.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती