शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सूड अन् बदल्याचे राजकारण हाच नरेंद्र मोदींचा अमृतकाळ; संजय राऊतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 11:13 IST

ईडी, सीबीआयसारख्या संस्था केंद्राच्या दबावाखाली काम करतात. देशातील सर्वच तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या बटीक आणि गुलाम झाल्यात.

नाशिक - जो सत्ताधाऱ्यांचा राजकीय विरोधक आहे त्यांच्या चूका शोधून काढल्या जातात. नसलेल्या चूका त्यांना मोठे केले जाते. सरकार पाडले जाते, पक्ष फोडला जातो हे लपून राहिले नाही आता उघड आहे. सूड आणि बदल्याचे राजकारण हाच नरेंद्र मोदींचा अमृतकाळ आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, ईडी, सीबीआयसारख्या संस्था केंद्राच्या दबावाखाली काम करतात. देशातील सर्वच तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या बटीक आणि गुलाम झाल्यात. भ्रष्टाचार हा एकाच पक्षाचा नसतो. जो सत्तेवर असतो त्याचा भ्रष्टाचार सर्वाधिक असतो. निवडणूक आयोग हा एकतर्फी काम करतोय. निवडणूक आयोग हा लोकशाहीचा कणा आहे तो कणाही मोदी सरकारने मोडून काढला असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत ईव्हीएमबाबतही लोकांना शंका आहे. कालच्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठकीत सर्वच विरोधी पक्षाची बैठक झाली. निवडणूक आयोगाची लफंगेगिरी यावर चर्चा केली जाते. ईव्हीएमची भूमिका आजची नाही. ईव्हीएमबाबत पहिला आवाज भाजपाने उचलला होता. सोमय्या आणि सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुराव्यासकट हे समोर आणले होते. बाळासाहेबांसमोरच सोमय्यांनी EVM हॅक कसे केले जाते हे दाखवले आहे. याच पुराव्याचा आधार घेत आम्ही पुढे रणनीती आखणार आहोत असंही राऊतांनी म्हटलं. 

राहुल गांधींची खासदारकी रद्द व्हावी यासाठी आटापिटान्यायव्यवस्थेसाठी सरन्यायाधीश एकांगी लढतायेत. राहुल गांधी यांना ज्या खटल्यात २ वर्षाची शिक्षा झाली ती नरेंद्र मोदींची बदनामी झाली असेल तर मोदींनी खटला दाखल करायला हवा होता. अन्य कुणी येतो तो याचिका दाखल करतो त्यावर सुनावणी होऊन शिक्षा सुनावली जाते. राहुल गांधींची लोकसभा खासदारकी रद्द व्हावी यासाठी सगळा आटापिटा आहे. सूरतचा निकाल त्यासाठीच दिला असावा असा आरोपही खासदार संजय राऊतांनी केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी