शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"देशात सौदेबाजीचे राजकारण, काँग्रेसचे आमदार विकले जाणार नाहीत", कमलनाथांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:34 IST

Kamal Nath : काँग्रेसने सावध पवित्रा घेत राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी कमलनाथ (Kamal Nath) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेते वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना महाराष्ट्राबाहेर नेलं आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. 

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने सावध पवित्रा घेत राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी कमलनाथ (Kamal Nath) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते कमलनाथ मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी कमलनाथ म्हणाले की, "आज देशात सौदेबाजीचे राजकारण सुरू आहे. मध्य प्रदेशचे उदाहरण तुम्हाला माहीत आहे. हे राजकारण आपल्या संविधानाच्या विरोधात असून भविष्यासाठी धोक्याची बाब आहे. आपल्या आमदारांशी कसे बोलायचे हे शिवसेनेनेच ठरवायचे आहे. काँग्रेसचे आमदार विकाऊ नाहीत."

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. पहाटे तीनच्या सुमारास गुजरातमधील सूरत येथून निघालेले हे आमदार सकाळी सातच्या सुमारास गुवाहाटी येथे पोहोचले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने कमलनाथ यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांसोबत कमलनाथ हे चर्चा करणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे सचिव केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी पत्राद्वारे माहिती दिली होती . दरम्यान, कमलनाथ हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू नेते मानले जातात.

काँग्रेसला 10 आमदारांची चिंतासोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसमध्येच क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे आणि काही मत फुटल्यामुळे काँग्रेसच्या गोटातही चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या निकालानंतर नाराज झालेले राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना