शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी वाटोळं केलं हे जनतेला माहीत आहे, त्यामुळेच तुमच्याकडे आरक्षण मागतोय; जरांगेंची आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:00 IST

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी महायुतीकडून वारंवार केला जातो.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, यासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सध्या शांतता रॅलीच्या माध्यमातून राज्यव्यापी दौरा सुरू आहे. सत्ताधारी महायुतीवर सातत्याने टीका करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. जनतेला माहीत आहे त्यांनी वाटोळं केलं आहे, त्यामुळेच तर लोक आता तुमच्याकडे आरक्षण मागत आहेत, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली आहे. 

मराठा आरक्षणाविषयी  शरद पवार यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. याबाबत प्रश्न विचारला असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "पवारांची भूमिका दुटप्पी आहे, मग तुमची भूमिका खूप सरळमार्गी आहे का? ११ महिने झाले तुम्ही म्हणाला होतात की सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करू. ४ दिवसांत गुन्हे मागे घेऊ असं तुम्ही १ वर्षांपूर्वी म्हणाला होता. जनतेला माहीत आहे त्यांनी वाटोळं केलं आहे. म्हणून तर लोक आता तुमच्याकडे आरक्षण मागत आहेत. पण तुम्ही तर त्यांच्यापेक्षाही खालच्या विचारांचे निघाला आहात. आमचं कोणी वाटोळं केलं, हे समाजाला माहीत आहे, १६ टक्के आरक्षण कुठं गेलं, हेही समाजाला माहीत आहे. त्यांनी आरक्षण दिलं नाही म्हणून तुम्हालाही द्यायचं नाही का?" असा सवाल मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेतून विचारला आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी महायुतीकडून वारंवार केला जातो. मात्र याच जरांगे यांनी आता थेट शरद पवार यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राणेंवरही साधला निशाणा

माझ्यावर टीका करत असलेल्या नारायण राणे यांच्या मुलांना आपण किंमत देत नसल्याचा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मी नारायण राणेंच्या पोरांना किंमत देत नाही. इकडे त्यांना कोण विचारतं? मी निलेश साहेबांना तीन चार वेळा सांगितलं की, मी राणे कुटुंबीयांचा सन्मान करतो. तुमचं काही ना काही तरी योगदान आहे. वय मोठं आहे. त्यांना समजून सांगा. मी त्यांचा सन्मान करतो. मी त्यांना एक शब्दही उद्देशून बोललेलो नाही. मग तुम्ही बळंच मला कशाला बोलता आणि तुम्ही बोलल्यावर मी कसा काय सोडेन का? मी शब्द वापरलाच नाही., तरी तुम्ही मला बोलता. आता कारण नसताना मी बोललो तर ते मला उलट बोलणारच ना. त्यामुळे कारण नसताना तुम्ही मला आणि समाजाला बोलला तर उत्तर मिळणारच ना? त्यामुळे समाजाविरुद्ध बोलू नका," असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण