शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाची बदनामी सहन केली जाणार नाही, खा. सुनील तटकरे उतरले मैदानात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 15:04 IST

शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट हा राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होऊन बाहेर पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री, मंत्री यांनी निधी वाटपात अन्याय केल्याचा सतत आरोप बंडखोर आमदार करीत आहेत.

अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि पक्षावर बंडखोर आमदारांकडून सतत होणारी बदनामी थांबवा, अन्यथा जशास तसे प्रत्त्युत्तर देऊ, असा इशारा  देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे आता या सगळ्या नाट्यात मैदानात उतरले आहेत. तटकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावरही शाब्दिक हल्ला चढविला आहे. त्यामुळे आता शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसही बंडखोरांबाबत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर पहिल्यांदाच तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट हा राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होऊन बाहेर पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री, मंत्री यांनी निधी वाटपात अन्याय केल्याचा सतत आरोप बंडखोर आमदार करीत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस ही आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. बंडखोर आमदारांनी केलेले आरोप ही त्यांची केविलवाणी धडपड आहे. बंडखोरांनी पक्षाची आणि शरद पवार यांची बदनामी थांबवा, अन्यथा योग्य वेळी त्याचे उत्तर देऊ, असा इशारा खा. तटकरे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेना असा प्रवास करणारे दीपक केसरकर हे पवारांना सल्ला देण्याइतके मोठे नाहीत. त्यांनी पवारांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोष देण्याचा प्रयत्न करू नये. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDeepak Kesarkarदीपक केसरकर