शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीड प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हीच भूमिका - प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:59 IST

या प्रकरणात वाल्मीक कराड असो किंवा अन्य कुणी असो, दोषींवर निश्चितच कठोर कारवाई व्हावी, असे खा. पटेल म्हणाले. बीड प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीसुद्धा गठित करण्यात आली आहे. त्यामुळे बाकी चर्चांना अर्थ नाही, असेही ते म्हणाले.  

गोंदिया : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणातील कोणीही गुन्हेगार असोत, त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार) भूमिका असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी गोंदिया येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

या प्रकरणात वाल्मीक कराड असो किंवा अन्य कुणी असो, दोषींवर निश्चितच कठोर कारवाई व्हावी, असे खा. पटेल म्हणाले. बीड प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीसुद्धा गठित करण्यात आली आहे. त्यामुळे बाकी चर्चांना अर्थ नाही, असेही ते म्हणाले.   ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीसंदर्भात विचारले असता, खा. पटेल म्हणाले, भुजबळ हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते नाराज आहेत, असे समजू नका. त्यांच्या सूचनांवर मार्ग काढू.   

पवार कुटुंब एकत्र आले तर आनंदच होईलउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पवार कुटुंब एकत्र यायला हवे, असे साकडे पांडुरंगाकडे घातले. यावरून दोन्ही पवार एकत्र येतील का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. यावर खा. पटेल यांनी सांगितले की, पवार कुटुंबीय एकत्र आले तर मला आनंदच होईल. पण, सध्या त्या अनुषंगाने कुठली चर्चा अथवा घडामोडी नाहीत. 

स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती म्हणून लढणारआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महायुती करून लढाव्यात, असा एकंदर सूर आहे. पण, यावर अद्याप कुठलीच चर्चा झालेली नाही. या निवडणुका महायुती करून लढाव्यात, यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही खा. पटेल यांनी सांगितले.  

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड