मुंबई - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बस दाखल होणार आहेत. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत या बसला ‘राजमाता जिजाऊ’ असे नाव देण्यात आल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसेसना यापूर्वी गौरवले आहे. आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
एसटीच्या राज्यभरातील गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ताफ्यात ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, भगव्या आणि पांढऱ्या शुभ्र रंगसंगतीत सजलेल्या असणार आहेत.
‘राजमाता जिजाऊ’ हे नाव केवळ नामकरण नाही, तर स्वराज्याच्या संस्कारांचा, मातृशक्तीच्या प्रेरणेचा आणि प्रवाशांच्या सोयीसाठीच्या बांधीलकीचे एक सन्मानचिन्ह आहे. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
जिजाऊ या प्रेरणाशक्ती आहेतराज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. स्वराज्य संकल्पनेमागे राजमाता जिजाऊ या प्रेरणाशक्ती आहेत. त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी आहेत. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या नवीन बसेसचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण करण्यात आले आहे.
Web Summary : Maharashtra's new ST buses will be named 'Rajmata Jijau' honoring motherhood. The 55-seater buses, in saffron and white, will gradually be added to routes across the state starting March. Minister Pratap Sarnaik stated this is a tribute to Jijau's inspiration.
Web Summary : महाराष्ट्र की नई एसटी बसों का नाम 'राजमाता जिजाऊ' रखा जाएगा, जो मातृत्व का सम्मान है। केसरिया और सफेद रंग की 55 सीटों वाली बसें मार्च से धीरे-धीरे पूरे राज्य में मार्गों पर जोड़ी जाएंगी। मंत्री प्रताप सरनाईक ने कहा कि यह जिजाऊ की प्रेरणा को श्रद्धांजलि है।