नालासोपाऱ्यातील ६१ वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह सावत्र मुलाला अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे.
वसईच्या पेरियार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आशिया खुसरु (६१) ही वृद्ध महिला मृत अवस्थेत संशयास्पद तिच्या राहत्या घरी आढळुन आला होता. तसेच तिच्या प्रेतावर शवविच्छेदन न करता तिचे पती व इतर जवळचे नातेवाईकांनी त्यांचे धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे तिचा परस्पर अंत्यविधी करुन प्रेत दफन करण्यात आल्याची माहिती बातमीदाराने रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक समीर अहिरराव यांना दिली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सत्यता पडताळून पुढील कायदेशिर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी टीमला दिले होते.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनने पोलीस पथके तयार करुन तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी घटनास्थळी असलेले मयत महिलेचे नातेवाईक व इतर साक्षीदार तसेच भौतीक पुरावे त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. वयोवृध्द मयत महिला आशिया खुसरु (६१) यांचा सावत्र मुलगा मो.इम्रान खुसरुला (३२) ताब्यात घेतले. त्याच्याकडे प्रथमतः पोलीस पथकाने केलेल्या चौकशीस तो कुठलीही दाद देत नव्हता व पोलीसांनी उडवा-उडवीचे उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता होता. परंतु गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने चौकशीमध्ये त्याने तो खेळत असलेल्या व्हि.आर.पी.ओ नावाच्या ऑनलाईन गेम खेळण्यासाठी त्याला १ लाख ८० हजार रुपयांची आवश्यकता होती. म्हणून त्याने आईकडे जाऊन पैश्याची मागणी केली. परंतु तिने त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला प्रचंड राग आला. याच रागातुन त्याने आईचे डोके राहते घरातील वॉश बेसिन जवळील भिंतीच्या अंकुचीदार कॉर्नरवर डोके आपटून व तिचे तोंडावर लाथा मारुन तिचा खुन केला. त्यानंतर त्याने सावत्र आईच्या घरातील बेडरुम मधील कपाटातील २ सोन्याच्या बांगड्या व एक सोन्याची चेन असे दागिने चोरी केले.
त्यावेळी तीचे पती मो.अमिर खुसरू (६५) यांनी मुलाने केलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा पुरावा नष्ट् करण्याच्या उद्देशाने घटनास्थळी सांडलेले रक्त पुसुन पुरावा नष्ट केला. तसेच मयत महिलेच्या प्रेताची विल्हेवाट लावणे सहज व सुकर व्हावे या हेतुने त्याच्या परिचीत डॉक्टरकडुन मयत वयोवृध्द महीलेचे मृत्यु प्रमाणपत्र प्राप्त केले. तिचे राहते घरातील जमीनीचे फरशीवर पडल्यामुळे तिच्या डोक्याला झालेल्या जखमामुळे मृत्यु झाल्याचा जाणुनबुजुन खोटा बनाव करुन माहिती तिचे नातेवाईक च इतर नागरिकांना दिली. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी पतीवर विश्वास ठेवून धार्मिक रिती रिवाजाप्रमाणे अंतीम संस्कार केले आहेत. वसई पोलिस ठाण्यात सहा. पोलीस निरीक्षक सागर शिंदे यांनी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सपोनि सोपान पाटील व सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहा. पोलीस उप निरीक्षक संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोहवा प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकुर, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, प्रतिक गोडगे, राज गायकवाड, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी आणि सायबरचे सहा. फौजदार संतोष चव्हाण यांनी केली आहे.