शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात लगीनघाई... दिवसात १८३ जीआर ! कोट्यवधींचे वाटप तरी नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:30 IST

Maharashtra Government: आर्थिक वर्ष संपण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता, त्यामुळे तब्बल १८३ जीआर प्रसिद्ध करून कोट्यवधी रुपयांचा निधी व अनुदान वितरित करण्यात आले. ईदची सुटी असूनही रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात कारभार सुरू होता.

 मुंबई - आर्थिक वर्ष संपण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता, त्यामुळे तब्बल १८३ जीआर प्रसिद्ध करून कोट्यवधी रुपयांचा निधी व अनुदान वितरित करण्यात आले. ईदची सुटी असूनही रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात कारभार सुरू होता.

मंत्रालयातल्या सर्व विभागांमध्ये लगबग दिसून आली. मध्यरात्री उशिरापर्यंत सर्व विभागांतील अधिकारी कामात व्यस्त होते. आर्थिक वर्ष संपण्याच्या आत निधी खर्च करण्यासाठी व प्रलंबित बिले देण्यासाठी आज ‘बँक हाॅलीडे’ असूनही सर्व विभागात काम सुरू होते. आर्थिक वर्षाच्या आत निधी खर्च न केल्यास तो निधी अखर्चित निधी म्हणून सरकारी तिजोरीत जमा होतो, त्यामुळे साहजिकच सर्वांत जास्त गर्दी वित्त विभागात होती. 

महावितरणला १४६ कोटींचे  बिनव्याजी कर्जआदिवासी कुटुंबाला निधी, कृषी महाविद्यालयांना निधी, कोकण कृषी विद्यापीठाला अनुदान, यंत्रमाग सहकारी सेवा संस्थाना शासकीय भागभांडवल, प्रशासकीय खर्चाला मंजुरी, औद्योगिक समूह विकास कार्यक्रमाच्या खर्चास मंजुरी, केंद्र शासनाकडून राज्यास भांडवली कर्ज स्वरूपात विशेष साहाय्य आदी योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज म्हणून महावितरण कंपनीला १४६ कोटी ८० लाख रुपये मंजूर करण्याचा निर्णय आला आहे.  

नागपूर हज हाउसपासून वक्फ बोर्डाला निधीनागपूर हज हाउसला १ कोटी २० लाख, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला भागभांडवल म्हणून २५ कोटी, अल्पसंख्याक वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी १५ लाख ८९ हजार, अल्पसंख्याक महिला व युवकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी २८ लाख ८० हजारांचा निधी, बचत गट योजनेसाठी ३ कोटी १३ लाख, अल्पसंख्याक आयोगाला संशोधन प्रशिक्षण योजनेसाठी २ कोटी रुपये दिले आहेत.  

जिल्हा परिषदांना ६९ कोटी, आरोग्य योजनेला दहा कोटीमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेला १० कोटी, संत सेवालाल लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत राज्यातल्या  जिल्हा परिषदांना ६९ कोटी ६८ लाख, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योनजेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील वीज ग्राहक कृषी पंपधारकास वीजदर सवलती पोटी महावितरण कंपनीला देय रक्कम म्हणून १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले.  

कंत्राटदार महासंघाची नाराजी कायम राज्य सरकारने ५४ हजार कोटींच्या बिलांपैकी फक्त ७४२ कोटी रुपये दिले. त्यात बँकांचे कर्जही वाढले आहे. बिलांची रक्कम देण्यासाठी आम्हाला ३१ मार्चची मुदत दिली होती. अजून काही ठोस निर्णय नाही. ५ एप्रिलला संघटनेची  बैठक होईल. त्यात मोठा निर्णय होईल. सर्व विकासकामे ठप्प होतील.मिलिंद भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMantralayaमंत्रालय