शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

ठाणे-बोरिवली टनेल बाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा लवकर सुटणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:44 IST

Thane Borivali Tunnel: मागाठाणे येथील बाधितांना एमएमआरडीएने दिले तीन पर्याय; भुयारीकरणाचा मार्ग मोकळा

मुंबई : ठाणे-बोरिवली द्वीन टनेल प्रकल्पात बोरिवली बाजूकडील मागाठाणे येथील बाधित होणाऱ्या ५७२ रहिवाशांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुनर्वसनासाठी तीन पर्याय देऊ केले आहेत. त्यामध्ये थेट आर्थिक मोबदला, स्थायी निवास अथवा एसआरए प्रकल्पात पुनर्वसन या पर्यायांचा समावेश आहे. त्यामुळे रहिवाशांचा पुनर्वसनाचा तिढा सुटणार असून, बोरिवली बाजूकडून भुयारीकरण सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठाणे-बोरिवलीदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ११.८५ किलोमीटर लांबीच्या मार्गाची उभारणी एमएमआरडीएकडून केली जात आहे. यात १०.२५ किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. या प्रकल्पाचे ठाणे बाजूकडील काम सुरू झाले आहे. कंत्राटदाराने भुयारीकरणासाठी टीबीएम मशीन बोगद्यात उतरविण्यासाठी शाफ्ट उभारणीचे काम सुरू केले आहे. मात्र, या प्रकल्पाची बोरिवली बाजूकडील भुयारीकरणापूर्वीची प्राथमिक कामेही सुरू झालेली नाहीत. त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीवरील रहिवाशांचे स्थलांतरण होणे बाकी आहे.

बाधितांनी लेखी स्वीकृती द्यावीबाधित नागरिकांनी या तीन पर्यायांपैकी कोणता पर्याय स्वीकारायचा आहे, हे लेखी स्वरूपात सादर करावे, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी रहिवाशांना उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे यांच्याशी संपर्क करता येईल. त्यामुळे आता हा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत.

रहिवाशांनी दर्शविला होता स्थलांतरणाला विरोधडिसेंबरमध्ये एसआरएने या झोपडपट्टीधारकांचे स्थलांतरण करण्यासाठी आवश्यक असलेले ३४३ संक्रमण गाळे एमएमआरडीएला दिले होते. मात्र, रहिवाशांनी या स्थलांतरणाला विरोध दर्शविला होता. त्यानंतर एमएमआरडीएने या प्रकल्पातील मागाठाणे परिसरातील रूपवतेनगर, मिलिंदनगर, फरलेवाडी, एसआरए प्रकल्पातील तसेच रस्त्यालगतच्या फूटपाथवरील अंदाजे ५७२ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी तीन पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे तीन पर्याय असणार

१) आर्थिक मोबदला: मुंबई १ महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आर्थिक मोबदला धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या बाधित होणाऱ्या झोपड्यांचे क्षेत्रफळानुसार आर्थिक मोबदला मिळेल.

२) स्थायी निवास: एमएमआरडीएतर्फे बोरिवली इंटिग्रेटेड वसाहतीमधील सदनिका मीरा-भाईंदर येथील रेंटल हाऊसिंग योजनेतील मे. गुजरात व सोनम एंटरप्रायजेस यांनी विकसित केलेल्या सदनिका प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार पुनर्वसनासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येतील.

३) एसआरए प्रकल्पामार्फत पुनर्वसन: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील भारद्वाज विकासकामार्फत राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार त्यांना समाविष्ट केले जाईल. विकासकामार्फत प्रकल्प बाधितांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी सदनिका देण्यात येणार असून, तात्पुरत्या स्वरूपात त्यांना भाडे अथवा सदनिका उपलब्ध करून देण्यात येतील.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र