शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऊन जरा जास्त आहे... मंगळवार ठरला सर्वांत उष्ण दिवस; महामुंबईला उन्हाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:31 IST

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आणखी काही दिवस तापमानाचा पारा चढा राहणार असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या आठ वर्षांमध्ये फेब्रुवारी महिन्यातील मंगळवार हा सर्वाधिक उष्णतेचा दिवस म्हणून नोंद करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार मुंबईत ३६.८ अंश सेल्सिअस तापमान होते. आठ वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर हवामान खात्याने मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आणखी काही दिवस तापमानाचा पारा चढा राहणार असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांनी वाढत्या तापमानाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. 

उन्हामुळे एकीकडे घाम, तर त्यात प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिडचिड वाढली आहे. वाढत्या तापमानात आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याची गरज आहे. तसेच दुपारी उष्णता अधिक असल्याने या काळात बाहेर जाणे टाळवे, असे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवारी मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानुसार पुढील दोन दिवस तापमान ३७ ते ३८ अंश इतके राहण्याची शक्यता आहे.

मुलांची काळजी घ्यासध्या परीक्षांचे दिवस आहेत. त्यामुळे मुलांना रोज शाळेतून ये-जा करताना या वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागत आहे. या वातावरणात मुलांना भूक लागत नाही. त्यामुळे खाण्याच्या तक्रारी वाढतात. यासाठी मुलांना हलका आहार देणे गरजेचे आहे. तसेच मुबलक प्रमाणात पाणी गरजेचे आहे.

आरोग्यावर परिणामडिहायड्रेशन, चक्कर येणे, हात-पाय दुखणे, पोटात मळमळणे, मूत्रविकाराच्या समस्या, उलट्या, जुलाब 

काय केले पाहिजे? दररोज २-३ लीटर पाणी प्यावे. नारळपाणी, ताक, दही, लस्सी, फळाचा ज्यूस प्यावा. चक्कर आल्यास ओआरएस प्यावे.

वातावरण बदलामुळे फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दिवसा गरम आणि रात्र थंड या वातावरणामुळे सुका खोकल्याच्या तक्रारी वाढतात. अशावेळी थंड पाणी पिणे टाळावे. तसेच आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. विनायक सावर्डेकर, औषधवैद्यक शास्त्र तज्ज्ञ, सेंट जॉर्जेस रुग्णालय.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात