शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आजी आजोबांना ‘फ्री’ फिरवले; एसटीला १,४४४ कोटी मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 11:43 IST

देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असतानाच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली.

मुंबई/यवतमाळ : गेली अठरा महिन्यांत २८ कोटी १० लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेतला. या प्रवासाची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून शासनाने १ हजार ४४४ कोटी ५३ लाख रुपये एसटीला अदा केले आहेत. देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असतानाच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली. एसटीने ही योजना २६ ऑगस्ट २०२२ पासून  राज्यभरात अंमलात आणली. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमधून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळाल्याने  ज्येष्ठांनी त्याचा चांगला लाभ घेतला. या योजनेमधून मिळालेली प्रवासी संख्या एसटीसाठी लाभदायी ठरली.  

बसचा तुटवडा : लालपरीपुढे आव्हानकाही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे १८ हजार बसेस होत्या. हळूहळू त्या आज १५ हजारांवर आल्या आहेत. त्यातीलही दररोज दोन ते अडीच हजार बसेस विविध कारणांमुळे रस्त्यावर धावत नाहीत. प्रत्यक्षात १३ हजार ५०० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. महामंडळाच्या बसमधून दररोज ५० ते ५२ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते.  

किलोमीटरवर भर गर्दीच्या हंगामात दररोजचे किलोमीटर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. एका बसची फेरी २०० किलोमीटर असेल तर ती ३०० किलोमीटर करून बसमधील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

टॅग्स :state transportएसटी