शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
3
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
4
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
5
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
6
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
7
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
8
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
9
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
10
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
11
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
12
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
13
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
14
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
15
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
16
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
17
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
18
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
19
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
20
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!

मदत नव्हे, ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला ८६ रुपयेच भरपाई

By राजाराम लोंढे | Updated: September 27, 2025 12:49 IST

मातीत घातलेल्या बियाण्याचे तरी पैसे द्या 

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य सरकारने ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीस मंजुरी दिली आहे. पण, मंजूर निधी पाहिला तर सरासरी गुंठ्याला ८६ रुपये मिळणार आहेत. परिपक्व अवस्थेतील पिकांचे नुकसान झालेले आहे, त्यामुळे पूर्व मशागत, बियाणे, भांगलण, औषध व खत याचा खर्च शेतकऱ्याला करावा लागला आहे. सरकार मुळात मदत देतानाच ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देते. मात्र, या मदतीतून त्याने मातीत घातलेल्या बियाण्याचा खर्चही निघत नाही.ऑगस्टमध्ये राज्यात १५ लाख ४५ हजार २५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शासनाच्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले हे क्षेत्र आहे. पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना नुकसान झाल्याने शेतकऱ्याने काढणीचा सोडला तर सर्व खर्च केलेला असतो. सोयाबीनची पेरणी गुंठ्याला दीड किलो लागते. साधारणत: शंभर रुपये किलो सोयाबीन बियाण्याचा दर आहे. शेतकऱ्याने मातीत दीडशे रुपये घातले आणि सरकार मदत देणार ८६ रुपये. पेरणीपूर्व व नंतरचा खर्च सोडा किमान मातीत बियाण्याच्या रुपाने मातीत घातलेले पैसे तरी सरकारने द्यावेत.

नुकसानीच्या ९ टक्के मदतसरकारच्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देते. ऊस पिकाचा विचार केल्यास गुंठ्याला टनाचे उत्पादन धरले तर त्याचे ३ हजार रुपये होतात. सरकारचे म्हणते किमान ३३ टक्के नुकसान झाले, मिळणाऱ्या उत्पादनाच्या ३३ टक्के भरपाई म्हणजे गुंठ्याला किमान ९०० रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, सरकार केवळ ८६ रुपये देते.

शेती पिकाचे नुकसान झाल्यास, प्रतिगुंठा

  • जिरायत जमिनीवरील पिके - ४२.५० रुपये
  • सिंचनाखालील जमिनीतील पिकांसाठी- १७० रुपये
  • बहुवार्षिक बागायती पिकांसाठी - २२५ रुपये
  • शेतजमिनीचे नुकसान झाल्यास - १८० रुपये
  • दरड कोसळून नुकसान, माती वाहून गेल्यास - ४७० रुपये

संपूर्ण महाराष्ट्र संकटात असताना नुकसानीचे पंचनामे कसले करता? तातडीने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. सरकारची मदत पाहिली तर गुंठ्याला ८६ रुपये दिली आहे. यातून शेतकऱ्यांचे बियाण्याचे पैसेही मिळत नाहीत. कर्जमाफी केल्याशिवाय आता शेतकरी उभाच राहू शकत नाही. - राजू शेट्टी (नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना)

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers mocked with paltry compensation: ₹86 per Guntha relief.

Web Summary : Farmers are dismayed by the state government's meager compensation for crop damage, receiving only ₹86 per Guntha. This amount barely covers the cost of seeds, let alone other expenses incurred during cultivation. Experts highlight the inadequacy of the relief compared to the actual losses suffered.