शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला दिल्ली भेटीत ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 08:56 IST

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल, आज मोदींची भेट घेणार

नवी दिल्ली : शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्ताराचा फॉर्म्युला कोणता राहील व पहिल्या टप्प्यात किती जणांची वर्णी मंत्रिमंडळात लागेल, यावरच प्रामुख्याने चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या, शनिवारला दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.

गेल्या आठवड्यात शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ही पहिलीच दिल्ली भेट आहे. पावणेआठ वाजता त्यांचे दिल्लीत आगमन झाल्यानंतर ते लगेच महाराष्ट्र सदनात दाखल झाले. पत्रकारांशी बोलल्यानंतर फडणवीस एकटेच निघून गेले. त्यानंतर काही वेळाने एकनाथ शिंदे निघाले. या नेत्यांनी अमित शहा व भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली.

गृह, महसूल भाजपकडेच?तसेच मंत्रिमंडळाची खाते वाटपावरही चर्चा होणार आहे. यात गृह, महसूल, नगरविकास ही खाती भाजपकडे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

विधिज्ञांशी चर्चाया दिल्ली भेटीत काही विधिज्ञांशी हे नेते चर्चा करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या संदर्भातही चर्चा होणार आहे. येत्या ११ जुलैला या संदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आहे. 

मंत्रिमंडळाच्या रचनेवर चर्चा - शिंदेमंत्रिमंडळाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा व जेपी नड्डा यांची भेट घेणार आहे. सदस्यांच्या अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाला आम्ही बांधिल आहोत. आमच्याकडे शिवसेनेचे दोनतृतीयांश आमदार असेही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.

शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदी निवडीला आव्हानशिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. ही निवड तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सेनेच्या बंडखोर गटाच्या मुख्य प्रतोदाला मान्यता देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने केलेल्या नव्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय येत्या सोमवारी (दि. ११) सुनावणी घेणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील घडामोडींप्रकरणी दाखल झालेल्या इतर याचिकांसोबतच या नव्या याचिकेचीही एकत्रित सुनावणी घेण्यात यावी, ही शिवसेनेची विनंती न्यायालयाने मान्य केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदी