शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सीमावासीयांना दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 11:16 IST

सीमाप्रश्नी खटल्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली

प्रकाश बेळगोजी

बेळगाव/मुंबई: बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमावासीयांसाठी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. या घोषणांची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नसल्याची बाब समितीने निदर्शनात आणून दिली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच सरकारी आदेश पाठवून घोषणांची अंमलबजावणी होईल, असे आश्वासन दिले.याचप्रमाणे अंतिम टप्प्यात असलेल्या सीमाप्रश्नी खटल्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली याचिका अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र अजूनही सुनावणीच्या तारखा पुढे ढकलण्यात येत आहेत. महाराष्ट्राने सीमाप्रश्नी सातत्याने कर्नाटकाच्या मंत्र्यांप्रमाणे पाठपुरावा करावा, सीमाप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटकातील न्यायाधीश कामकाजात सहभाग घेणार नाहीत, यासाठी शिफारस करावी अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या.याचप्रमाणे फोल ठरत असलेल्या सिमकक्षाविषयीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. सिमकक्षात कर्मचाऱ्यांची कमी असून सीमाप्रश्नाविषयी अभ्यास करणाऱ्या आणि कामकाज पाहणाऱ्या व्यक्तीची ऐनवेळी बदली होते. सीमासमन्वय मंत्री बाजू सांभाळण्यात कमी पडतात. यामुळे कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कायमस्वरूपी काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, वकील आणि सीमा समन्वय मंत्र्यांची बैठक घेण्यात यावी, जेणेकरून सीमाप्रश्नी कोणत्याही गोष्टीत महाराष्ट्राची बाजू कमकुवत राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा मागण्याही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. येत्या २८ फेब्रुवारी रोजी छेडण्यात आलेल्या आंदोलांसंदर्भातदेखील चर्चा करण्यात आली असून या आंदोलनासाठी अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. याचप्रमाणे या आंदोलनास आपण देखील उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी मंत्री शंभूराजे देसाई, सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार आणि समिती नेते मनोहर किणेकर, विकास कलघटगी, प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री