शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 17:24 IST

आज राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस(शप) प्रमुख शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते.

Sharad Pawar and Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) अनेकप्रसंगी एकत्र दिसले आहेत. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्र स्टेट कॉऑपरेटिव्ह बँक लि. आयोजित 'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी काका-पुतणे एकाच मंचावर शेजारी-शेजारी बसलेले पाहायल मिळाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते. 

शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंतीया कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी अजित पवारांसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहकारी कारखान्याबाबत एक विनंती केली. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील सगळे सहकारी कारखान्यांची काय अवस्था झाली आहे...आधी 80  टक्के सहकारी आणि 20 टक्के खासगी कारखाने होते. पण, आता 50 टक्के खासगी कारखाने झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी एक कमिशन अपॉइंट करुन आणि या सहकारी संस्थाचा अभ्यास करावा. नेमक्या काय अडचणी आहेत, ते पाहावे, असे शरद पवार म्हणाले. 

पवार पुढे म्हणतात, दख्खनचा उठाव इथ जो संघर्ष झाला, त्यावेळी इंग्रजांना शेतकऱ्यांचे दुःख समजले आणि त्यांनी उपाय योजना केल्या. त्यावेळी सावकार आणि व्यापारी यांच्याकडून कर्ज शेतकऱ्यांना घ्याव लागत होते मात्र ते बंद झालं आणि सहकारातून त्यांना कर्ज मिळू लागले. राज्य सहकारी बँकेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पूर्वी साखर कारखानदारी नव्हती गूळाचा धंदा होता. एक व्यापारी गूळ करायचा आणि त्याचा त्या मार्केटवर दबाव असायचा, मात्र हे बदलण्यात आले आणि त्यावर पर्याय म्हणून या बँकेची स्थापना करण्यात आली.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया शरद पवारांच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात 50 टक्के सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. हे शरद पवारांनी सांगितले हे खरे आहे. साखर उद्योगात केवळ साखरेवर कारखाना चालू शकत नाही, आता त्याच्याशी संबंधित इतर व्यवसाय करावे लागणार आहे. सहकारी कारखान्यात प्रोफेशनल काम पाहिला मिळत नाही. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोगिरभरती पाहिला मिळत आहे. सहकारातील महत्वाचा घटक म्हणजे सहकारी संस्था आहेत. आम्ही सेल्फ रीडेव्हलपमेंट ही योजना देखील आम्ही राबवत आहोत, अशी माहिती मुख्ममंत्र्यांनी दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस