शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मंडळाची रूपरेषा ठरणार, मुख्यमंत्र्यांनी घातलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:22 IST

मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय - शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ‘रिक्षावाला’ म्हणूनही त्यांना हिणवले गेले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ‘रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी घेतला. याची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार उदय सामंत आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर सोपविली असून, त्यांना मंडळाची रूपरेषा तयार करण्यास सांगितले आहे. या मंडळाचा फायदा राज्यातील साडेआठ लाख रिक्षा व १ लाख २० हजार टॅक्सीचालकांना होणार आहे. 

शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ‘रिक्षावाला’ म्हणूनही त्यांना हिणवले गेले. शिंदे यांनी आयुष्याच्या सुरुवातीला रिक्षा चालविली होती. त्यानंतर ते राजकारणात आले. मुख्यमंत्रिपदी बसल्यावर रिक्षा  व टॅक्सीचालकांसाठी काही करता यावे, या उद्देशाने त्यांनी पावले उचलली आहेत. रिक्षा व टॅक्सीचालकांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, त्यांच्या मुलांचे शिक्षण, रिक्षा व टॅक्सीचालकांच्या कुटुंबाचे आरोग्य यांसारख्या प्रश्नांची सोडवणूक या मंडळामार्फत केली जाणार आहे.

राज्यातील रिक्षा व टॅक्सीचालकांना रिक्षा-टॅक्सी चालक, मालक कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व स्वीकारावे लागेल. या संदर्भातील एक बैठक खासदार डॉ. शिंदे, आमदार सामंत आणि माजी महापौर म्हस्के यांनी घेतली असल्याची माहिती  आहे. मंडळाच्या माध्यमातून या बांधवांना अनेक प्रकारची मदत केली जाणार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, महिलाच्या प्रसूतीसाठी आर्थिक मदत, ६० वर्षांवरील रिक्षा-टॅक्सी चालकांना पेन्शन योजना, नवीन वाहनासाठी आर्थिक मदत, इन्शुरन्स व रुग्णालय मदत दिली जाणार आहे. 

 रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा देण्याकरिता तिघांची नियुक्ती केली आहे. आता हे मंडळ कसे असेल त्याची दिशा ठरविली जाणार आहे. तसेच रिक्षा व टॅक्सीचालकांना या माध्यमातून कशी मदत करता येऊ शकते, याचाही अभ्यास केला जाणार आहे.- नरेश म्हस्के, माजी महापौर

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीauto rickshawऑटो रिक्षा