शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सेवा हमी कायदा अंमलबजावणीचा मुख्य सचिव घेणार महिन्याला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 06:44 IST

६६२ सेवा कालमर्यादेत देण्याची हमी; ५० टक्के पदे रिक्त

मुंबई - शासकीय कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा मुदतीत मिळाव्यात यासाठी राज्यात सेवा हमी कायदा २०१५ पासून लागू केला होता. मात्र हा कायदा प्रभावी होऊन जनतेला जलद सेवा मिळाव्यात यासाठी दर महिन्याला सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्य सचिव यांना दिले जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 

विधानसभेत आमदार प्रकाश आबीटकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून राज्यातील शासकीय सेवा जनतेपर्यंत कालमर्यादेत पोहोचत नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कर्मचारी वर्ग शासनाने नेमला नसल्याचे सांगत या कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रचार आणि प्रसिद्धी शासनाकडून केली जात नाही. त्यामुळे ज्या सेवा शासनाकडून दिल्या जाणार आहे, त्या सेवांबाबत जनतेला माहितीच नसल्याचेही यावेळी आबीटकर म्हणाले. 

आधी मंत्रालयाचे सहा मजले तर सुधारा...बच्चू कडू कडाडलेआमदार बच्चू कडू यांनीही या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशासनाला धारेवर धरत जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयात योग्य काम करत नाहीत, ते या कायद्याची काय अंमलबजावणी करणार अशी संतप्त भावना व्यक्त करत आधी मंत्रालयातील सहा मजले सुधारा अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांची सही झालेली फाइल मंत्रालयातून चार वर्षांनी बाहेर पडते असे उदाहरण देत, कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार किती कारवाई झाली याची माहिती देण्याची मागणी कडू यांनी केली.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले... राज्यातील मुख्यसेवा आयुक्तांसह सहा सेवा आयुक्तांच्या नियुक्त्या झाल्या असून, कर्मचारी-अधिकारी वर्गाच्या मंजूर पदांपैकी ५० टक्केजागा रिक्त आहेत. या कायद्यांतर्गत एकूण ६६२ सेवा जनतेला ठरावीक कालमर्यादेत दिल्या जाण्याची हमी या कायद्यानुसार बंधनकारक केली असून, आजवर जवळपास ९५ टक्के अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. सदर कायद्यानुसार जनतेला कोणत्या सेवा किती दिवसात मिळणार आहे याचे नियम केले आहेत. मात्र, या सेवा कायद्याची जनतेला माहिती व्हावी आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि प्रचार करण्यात येईल.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईVidhan Parishadविधान परिषद