शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान

By योगेश पांडे | Updated: October 10, 2025 22:33 IST

Mohan Bhagwat News: भोसले घराणे आणि संघातील ऋणानुबंध हे राजे लक्ष्मणराव भोसले आणि डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून आहे. शिवाजी महाराजांनी दिलेली प्रेरणा भोसले घराण्याच्या माध्यमातून नागपुरात रुजली आणि म्हणूनच कदाचित या मातीतून संघ जन्माला आला असावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले

- योगेश पांडे नागपूर  -  भोसले घराणे आणि संघातील ऋणानुबंध हे राजे लक्ष्मणराव भोसले आणि डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून आहे. शिवाजी महाराजांनी दिलेली प्रेरणा भोसले घराण्याच्या माध्यमातून नागपुरात रुजली आणि म्हणूनच कदाचित या मातीतून संघ जन्माला आला असावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. उदय जोशी लिखित आदिपर्व, संघर्षपर्व, कलहपर्व आणि ऱ्हासपर्व तसेच डॉ. हरदास यांची महालची भ्रमंती आणि धर्मभूषण श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले ही सहा पुस्तके शुक्रवारी प्रकाशित करण्यात आली. यावेळी सरसंघचालक बोलत होते.

महालातील सीनियर भोसला पॅलेस येथे हा कार्यक्रमाला अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, श्रीमंत मुधोजी राजे भोसले, लाखे प्रकाशनचे संचालक चंद्रकांत लाखे, लेखकद्वय उदय जोशी आणि डॉ. भालचंद्र हरदास प्रामुख्याने उपस्थित होते. आपलेपणा विसरल्यामुळे आपला समाज विभाजित होत होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मित्र जोडून सामर्थ्य उभे केले. आपल्या मातीबद्दलचा, देशाबद्दलचा शिवाजी महाराजांचा विचार जोपर्यंत प्रभावी होता, तोपर्यंत आपला इतिहास सरशीचा होता. महाराजांच्या या आपलेपणाच्या प्रेरणेचे स्मरण ठेवले पाहिजे. भारतावर अनादी काळापासून सातत्याने हल्ले होत राहिले. परंतु, कुठलाही परकीय आक्रांता एक रात्र देखील स्वस्थपणे झोपू शकला नाही. परकीय आक्रमकांनी या देशात पाऊल ठेवल्यापासून त्यांना कायम विरोध होत होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रयोगाला मिळालेल्या यशाचे देशातील इतर राजकारण्यांनी अनुकरण केले. ही परंपरा शेवटपर्यंत चालविण्याचे काम नागपूरकर भोसल्यांनी केले. अप्पासाहेब भोसलेंनी काबुल-कंदहार पर्यंत इंग्रजांच्या विरोधात दिलेला लढा हे त्याचेच द्योतक होते, असे सरसंघचालक म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा उंबरठा नागपुरात आहे याचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेसाठी भोसल्यांच्या वाड्याचे प्रांगण खुले करून दिले होते. भोसल्यांच्या घराला अनेक संतांचा आशीर्वाद लाभला आहे असे प्रतिपादन जितेंद्रनाथ महाराजांनी केले.

भोसल्यांच्या घराण्याचा हा इतिहास सर्व भाषेत लोकांसमोर यायला हवा. भोसले घराणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच श्रीनाथ पीठाचे गुरू घराणे यांचे संबंध या पुस्तकांमधून अधोरेखित होत आहेत, असे मुधोजीराजे भोसले म्हणाले. डॉ. हरदास यांनी महालचे वैशिष्ट्य, भोसले घराण्याचे आणि संघाचे संबंध तसेच पुस्तकाच्या रचनेबद्दल माहिती दिली. प्रकाश एदलाबादकर यांनी संचालन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhonsle family inspired Shivaji, hence RSS born in Nagpur: Bhagwat.

Web Summary : Bhagwat stated the Bhonsle family's inspiration from Shivaji Maharaj led to RSS's birth in Nagpur. He highlighted the historical connection between the Bhonsle family and RSS, emphasizing their shared values and contributions to the nation.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर