‘लोकमत कालदर्शिका’ पंचांगाचे थाटात प्रकाशन
By Admin | Updated: November 25, 2014 00:51 IST2014-11-25T00:51:09+5:302014-11-25T00:51:09+5:30
अध्यात्म, आरोग्य, वास्तू, करिअर, पाककृती, सौंदर्याच्या साहित्यांसह तिथी, पंचांग, मुहूर्त, राशी भविष्य, संकष्टी चतुर्थी आदींच्या इत्यंभू माहितीचा लेखाजोखा मांडणारे ‘लोकमत कालदर्शिका’

‘लोकमत कालदर्शिका’ पंचांगाचे थाटात प्रकाशन
महाराष्ट्रात सर्वाधिक विक्रीचा विश्वास : मान्यवरांची प्रतिक्रिया
नागपूर : अध्यात्म, आरोग्य, वास्तू, करिअर, पाककृती, सौंदर्याच्या साहित्यांसह तिथी, पंचांग, मुहूर्त, राशी भविष्य, संकष्टी चतुर्थी आदींच्या इत्यंभू माहितीचा लेखाजोखा मांडणारे ‘लोकमत कालदर्शिका’ या वार्षिक पंचांगाचे उद्घाटन लोकमान्य बुक डेपोचे (कर्मवीर बुक डेपो) संचालक मधुसूदन बिंझाणी, एस.जी. उन्हाळे अॅण्ड कंपनीचे संचालक गिरीश उन्हाळे आणि लोकमतचे समन्वयक संपादक कमलाकर धारप यांच्या हस्ते सोमवारी लोकमत भवनात थाटात झाले. ही कालदर्शिका संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.
मधुसूदन बिंझाणी यांनी सांगितले की, गुणवत्ता, त्यातील घटक, सजावट आणि ब्रॅण्डनेम हे कालदर्शिकेचे मुख्य आकर्षण आहे. किंमत २४ रुपये असून सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. कुणीही खरेदी करून भिंतीवर लावावे, असे आकर्षण या कॅलेन्डरमध्ये आहे. अन्यच्या तुलनेत या कालदर्शिकेची बाजारात सर्वाधिक विक्री होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भात २० लाखांपेक्षा जास्त मराठी तिथीचे कॅलेन्डर विकले जातात. त्यात सर्वाधिक वाटा लोकमत कालदर्शिकेचा राहील.
गिरीश उन्हाळे यांनी सांगितले की, लोकमतने ‘ग्रीप’ धरली आहे. कालदर्शिकेची महती लोकांना कळली असून सध्या मागणी वाढली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लोकमत आघाडीचा ब्रॅण्ड असून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हेच बिरुद कालदर्शिकेशी जुळल्याने प्रत्येकाच्या घरात हेच पंचांग राहील.
लोकमत कालदर्शिकेत राशिचक्रकार शरद उपाध्ये यांनी ‘भोंदू गुरू आणि फसवे ज्योतिषी’ या विषयावर मत मांडले आहे. हृदयरोग टाळता येऊ शकतो, यावर डॉ. रमकांत पांडा, जीवनशैली बदला, मधुमेह टाळा, यावर डॉ. व्यंकटेश शिवणे, प्राचीन वास्तूशास्त्रावर डॉ. रविराज अहिरराव, सौंदर्य साधनेवर शुभांगी लाटकर, ‘क’ करिअरचा, यावर शेखर कुंटे, पर्जन्य अंदाज, अधिकमास, विज्ञान, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि शेतीच्या विकासावर भय्यूजी महाराजांनी विचार मांडले आहे.
प्रकाशनप्रसंगी लोकमतचे उपमहाव्यवस्थापक (वितरण, पूर्व महाराष्ट्र) संतोष चिपडा, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक मुश्ताक शेख आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)