शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

'म्हणूनच यांना डॅाक्टरपेक्षा कंपाऊंडरवर विश्वास आहे'; गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 20:17 IST

'शरद पवारांना खुर्ची दिल्याबद्दल मी संजय राऊत यांना नमन करतो'-जितेंद्र आव्हाड

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या फोटोवरुन भाजप नेते आणि काही ट्रोलर्स राऊतांवर टीका करत आहेत. यातच आता भाजप नेत्या गोपीचंद पडळकर यांनीही राऊतांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

मागे एकदा संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरवर जास्त विश्वास आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरुनच गोपीचंद पडळकर यांनी  राऊतांवर जहरी टीका केली आहे. पडळकर यांनी ट्विटरवर संजय राऊत शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच, कॅप्शनमध्ये 'म्हणूनच यांना डॅाक्टरपेक्षा कंपाऊंडरवर विश्वास आहे!' असे लिहीले आहे. 

'शरद पवारांना खुर्ची दिल्याबद्दल मी संजय राऊत यांना नमन करतो'याच प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांच्या कृतीवर सकारात्कम प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करुन आपली प्रतिक्रीया दिली. 'संजय राऊत यांनी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली. शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभे राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. मुख्यमंत्री आल्यानंतर कितीही मोठा मंत्री असला तरी तो उठून उभा राहतो. हा त्या मुख्यमंत्रीपदाचा आदर आहे.' 

‘वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर आपणही त्यांना बसायला जागा देतो. मग तो कोण माणुस आहे, हे पाहत नाही. संजय राऊत यांनीही तेच केलं. शरद पवार या व्यक्तिमत्वाबद्दल, वयाबद्दल, त्यांच्या शारिरीक अस्वस्थेबद्दल संजय राऊतांना माहित आहे. त्यामुळेच त्यांनी तात्काळ खुर्ची आणली आणि दिली. संजय राऊत यांचे आभार मानतो आणि त्यांना नमन करतो’, असंही जितेंद्र आव्हाड व्हिडीओमध्ये म्हणाले.

 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSanjay Rautसंजय राऊतJitendra Awhadजितेंद्र आव्हाड