महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात का? यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रोखठोक भाष्य केले आहे. "दोघेही एकाच व्यासपीठावर, एकाच ठिकाणी येणार असतील, तर निश्चितपणे त्यात मराठी माणसाचे हित आहे. अले पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आज आहे आणि कालही होतं. खरेतर, मी आणि बाळा नानगावकर, आम्ही दोघांनी यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, हात पुढे केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीच त्यांना हो म्हटले नाही नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे माला म्हणाले होते, "एक मॅन में दो तलवारे नही रहती है."
कदम पुढे म्हणाले, "मला अजून आठवतंय, हे वाक्य तेव्हा उद्धव ठाकरे यांचे होते आणि राज ठाकरे यांची तेव्हा मागणी काय होती? फक्त माझ्याकडे दोन जिल्हे द्या, एक पुणे आणि नाशिक, बाकी उद्धवने सांभाळावे. तेव्हा उद्धव ठाकरे नाही म्हणाले होते. आता वेळ अशी आलेली आहे की, उद्धव ठाकरे यांच्या हातात सगळंच गेलंय. आकाश फाटलंय, आता ठिकाण लावणार कुठे? मग राज ठाकरे जर येत असतील तर त्यांचा आधार घेऊन थोडासा आपल्याला राजकारणामध्ये डोकं वर काढता येईल का? हा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा असावा." कदम टीव्ही९ मराठीसोबत बोलत होते.
आता अटीशर्ती घालण्याचा प्रश्न कुठे येतो? -"मी त्या दोघांना जवळून पाहिलंय. राज ठाकरे स्पष्ट बोलणारे आहेत, आतल्या काठीचे नाहीयेत, ओपन आहेत. पण उद्धव ठाकरे आतल्या काठीचा माणूस आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरेना कधीच पुढे येऊ देणार नाही. आता अटीशर्ती घालण्याचा प्रश्न कुठे येतो? तुम्ही भाऊ आहात ना दोघेही?" असा सवालही यावेळी रामदास कमद यांनी केला.
'ती' शिवसेनेकडून झालेली मोठी चूक -महाबळेश्वर येथील कार्यक्रमाचा संदर्भात देत कदम म्हणाले, "त्यावेळेला एक चूक झाली आमच्याकडून. मी आता अधिक स्पष्टपणे बोलणार नाही. महाबळेश्वरला ज्यावेळी उद्धव ठाकरेना अध्यक्ष केले, त्यावेळी राज ठाकरेना अध्यक्ष करायला हवे होते. ही शिवसेनेकडून झालेली मोठी चूक आहे. मोठी कुठे चूक आहे. राज ठाकरे तेव्हा अध्यक्ष झाले असते तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. शिवसेना फुटली नसती." एवढेच नाही तर, "राज ठाकरे यांच्याकडे माणसं ओळखण्याची किमया आहे. ते पण वाघासारखे माणूस आहेत, त्यांना वाघासारखी माणसं लागतात. उद्धव ठाकरेना सुभाष देसाईंसारखी माणसं लागतात, शेळ्या-मेंढ्या," असेही कदम म्हणाले.