ठाणो मेट्रोच्या सव्र्हेक्षणाला सुरुवात

By Admin | Updated: July 1, 2014 01:41 IST2014-07-01T01:41:59+5:302014-07-01T01:41:59+5:30

ठाण्यात येऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सव्र्हेक्षणाला अखेरीस सोमवारी सकाळपासूनच एमएमआरडीएच्या अधिका:यांनी ठामपा अधिका:यांसमवेत सुरुवात केली.

Thanu Metro starts the survey | ठाणो मेट्रोच्या सव्र्हेक्षणाला सुरुवात

ठाणो मेट्रोच्या सव्र्हेक्षणाला सुरुवात

>ठाणो : ठाण्यात येऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सव्र्हेक्षणाला अखेरीस सोमवारी सकाळपासूनच एमएमआरडीएच्या अधिका:यांनी ठामपा अधिका:यांसमवेत सुरुवात केली. त्यामुळे मेट्रो प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, या कारशेडला काही शेतक:यांनी विरोध केला आहे. त्यांच्या जमिनीव्यतिरिक्त हा सव्र्हे करण्यात आला.  
घाटकोपर ते कासारवडवली व्हाया तीनहात नाका या मार्गावर मेट्रो रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. या मार्गासाठीच्या सर्व शासकीय मंजु:या मिळाल्या आहेत. त्याशिवाय, कासारवडवली येथे उभारण्यात येणा:या कारशेडसाठीही शेतक:यांची समजूत काढण्यात पालिका प्रशासन आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना यश आले आहे. योग्य मोबदला देण्यात येणार असल्याने या शेतक:यांनी कारशेडसाठी आपल्या जमिनी देण्यास हिरवा कंदील दर्शविला. त्यामुळेच या प्रस्तावित मेट्रो मार्गाचे तसेच प्रस्तावित कारशेडच्या 4क् हेक्टर जागेचा सव्र्हे सुरू करण्यात आला आहे. 
दरम्यान, कासारवडवली येथे मेट्रोचे कारशेड उभारण्यास येथील शेतक:यांनी अनुकूलता दर्शविली आहे. या प्रकल्पामुळे जमिनींच्या किमंतींमध्ये वाढच होणार असल्याने शेतक:यांना दुप्पट फायदा मिळणार आहे. तसेच, भूमिपुत्रंना रोजगारही मिळणार आहे.
त्यामुळेच या शेतक:यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी दत्तू पाटील, चंद्रकांत भोईर, रघुनाथ पाटील, अरविंद शिंगे, सुदाम पाटील, कृष्णा भोईर, कमलाकर पाटील, भूषण पाटील, विलास ठाकूर आदी शेतक:यांच्या जमिनी बाधित होत असून, या शेतक:यांनी  जागा प्रकल्पासाठी देऊ केल्या आहेत. 
 
विरोधाची भूमिका घेणा:या शेतक:यांची काँग्रेसचे ठाणो शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांनी भेट घेतली. या वेळी सव्र्हेसंदर्भातील नोटिसा न देताच सव्र्हे सुरू करण्यात आला असल्याचा आरोप अनेक शेतक:यांनी केला. तर, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन पूर्णेकर यांनी दिले. 

Web Title: Thanu Metro starts the survey