शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या भावना समजून MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार - संभाजीराजे

By ravalnath.patil | Updated: October 9, 2020 19:33 IST

Sambhaji Raje : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केले आहे.

ठळक मुद्देआज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन  एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससीची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विविध संघटना, नेत्यांकडून होत होती. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन  एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केले आहे. करत खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाची भावना पटली असून या निर्णयाबद्दल मी मराठा समाजाच्यावतीने त्यांचे आभार मानतो, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. याचबरोबर, संभाजीराजे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "मराठा समाजाच्या भावना समजून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, याबद्दल मराठा समाजाच्यावतीने सरकारचे सर्वप्रथम  आभार!", असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?येत्या 11 तारखेला महाराष्ट्रात 200 जागांसाठी एमपीएससी परीक्षा जाहीर झाली होती. आज आमची बैठक झाली. गेल्या चार महिन्यात कोरोनाचे संकट आहे. गेल्या काही महिने अभ्यासिका, क्लासेस बंद होते. विद्यार्थ्यांच्या सूचना आल्या, अभ्यासाला वेळ मिळायला हवा. त्यामुळे ही परीक्षा काहीकाळ पुढे ढकलत आहोत, यापूर्वी दोनवेळा परीक्षा पुढे ढकलली होती. आता पुढे जी तारीख ठरवू त्याच तारखेला काहीही करून परीक्षा होईल. जे 11 तारखेच्या परीक्षेला पात्र होते, ते सर्व पुढच्या तारखेला म्हणजे जी तारीख जाहीर होईल, त्या तारखेसाठी पात्र असतील, कोणाचंही वय वाया जाणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'परीक्षा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन' मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली होती. तर खासदार संभाजीराजे यांनी ही परीक्षा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरकारला दिला होता. 2019मध्ये ज्या एमपीएससी परीक्षा झाल्या त्यात 420पैकी मराठा आणि इतर समजाच्या नियुक्त्या झाल्या नाहीत, हा मुद्दा सरकारसमोर संभाजीराजेंनी बैठकीत मांडला होता. तसेच, एमपीएससीच्या पूर्वीच्या जागा भरल्या नाहीत, मग पुन्हा भरती का काढली हा आमचा प्रश्न आहे. अकरावी आणि अभियांत्रिकी कॉलेज सोडले तर काही अडचण नाही. सरकारने जागा वाढवाव्यात, अशी मागणीही संभाजीराजे छत्रपतींनी केली होती. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षा