ठाण्याच्या महिलेचा दरीत कोसळून मृत्यू

By Admin | Updated: January 29, 2017 00:22 IST2017-01-29T00:22:03+5:302017-01-29T00:22:03+5:30

पर्यटन आणि देवीदर्शनासाठी कुटुंबासह येथे आलेल्या महिलेचा शनिवारी सकाळी १०० फूट खोल देवी पॉइंटच्या दरीत कोसळून मृत्यू झाला. तिच्या मागे माकडे

Thane's woman collapsed in the valley | ठाण्याच्या महिलेचा दरीत कोसळून मृत्यू

ठाण्याच्या महिलेचा दरीत कोसळून मृत्यू

चिखलदरा (अमरावती) : पर्यटन आणि देवीदर्शनासाठी कुटुंबासह येथे आलेल्या महिलेचा शनिवारी सकाळी १०० फूट खोल देवी पॉइंटच्या दरीत कोसळून मृत्यू झाला. तिच्या मागे माकडे धावल्याने पाय घसरून ती दरीत पडल्याचे सांगण्यात आले.
कल्पना संतोष पालवे (२८, रा. कसाराघाट, ता. शहापूर, जि. ठाणे) असे मृताचे नाव आहे. कुटुंबातील दहा-बारा सदस्यांसह कल्पना देवी पॉइंटवरील मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. शुक्रवारपासूनच पालवे कुटुंबीय मंदिरातच मुक्कामाला होते. लघुशंकेनंतर देवी पॉइंटच्या मोझरी खोऱ्याच्या कठड्याकडून परतत असताना काही माकडे पाठीमागे लागल्याने घाबरलेल्या कल्पना धावत सुटल्या. तेव्हा पाय घसरून त्या शंभर फूट खोल दरीत कोसळल्या व त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Thane's woman collapsed in the valley