ठाणे : महिलेकडे बॉडी मसाजची मागणी करत छळणा-याची तुुरूंगात रवानगी

By Admin | Updated: August 31, 2016 11:18 IST2016-08-31T11:12:52+5:302016-08-31T11:18:37+5:30

महिलेला वारंवार फोन करून तिच्याकडे बॉडी मसाजची मागणी करत तिला त्रास देणा-या महाभागाला पोलिसांनी हिसका दाखवत तुरूंगवारी घडवली.

Thane: The victim will be tortured to death by demanding body massage | ठाणे : महिलेकडे बॉडी मसाजची मागणी करत छळणा-याची तुुरूंगात रवानगी

ठाणे : महिलेकडे बॉडी मसाजची मागणी करत छळणा-याची तुुरूंगात रवानगी

 ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. ३१ - महिलेला वारंवार फोन करून तिच्याकडे बॉडी मसाजची मागणी करत तिला त्रास देणा-या महाभागाला पोलिसांनी हिसका दाखवत तुरूंगवारी घडवली आहे. ठाण्यातील कोपरी भागात ही घटना घडली आहे. गुजरातमधील सिल्व्हासा येथे एका खासगी कंपनीत काम करणा-या अंकज पांडे (वय २४) याने कोपरी येथे राहणा-या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला (३५) फोन करून तिच्याकडे बॉडी मसाजची मागणी केली. तुमचा नंबर ' एस्कॉर्ट'  (कॉलगर्ल्स ) सर्व्हिस पुरवणा-यातर्फे मिळाल्याचे सांगत त्याने त्या महिलेला बराच वेळ फोन केला. मात्र ही माहिती चुकीची असल्याचे त्या महिलेने स्पष्ट केल्यानंतरही तो तिला फोन करून त्रास देत राहिला. अखेर तिने त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला.
मात्र त्यानंतरही पांडे याने वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत त्या महिलेला त्रास देणे सुरूच ठेवले. एके दिवशी त्याने त्या महिलेला कोपरी येथील १२ बंगला भागात भेटण्यास बोलावले. त्रस्त झालेल्या महिलेने सर्व कॉल रेकॉर्ड करून कोपरी पोलिसांकडे तक्रार नोंदवत ते पुरावे त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिस व सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी सापळा रचत त्या नराधमाला १२ बंगला भागात रंगेहाथ पकडले. व पोलिसांनी त्याची रवानगी तुरूंगात करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Thane: The victim will be tortured to death by demanding body massage