ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर सेवा चार तास ठप्प

By Admin | Updated: June 30, 2016 04:44 IST2016-06-30T04:44:16+5:302016-06-30T04:44:16+5:30

मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर उपनगरीय सेवेची त्यातून सुटका होण्याची चिन्ह सध्यातरी दिसत नाही.

Thane-Vashi trans-harbor service jammed for four hours | ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर सेवा चार तास ठप्प

ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर सेवा चार तास ठप्प


मुंबई : तांत्रिक समस्यांनी पछाडलेल्या मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर उपनगरीय सेवेची त्यातून सुटका होण्याची चिन्ह सध्यातरी दिसत नाही. बुधवारी संध्याकाळी ऐरोली स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरला विद्युत पुरवठा होण्यास तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे ठाणे ते वाशी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे लोकलच्या ४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास ठाणे ते ऐरोली स्थानका दरम्यान अप (ठाणे दिशेने) मार्गावरील ओव्हरहेड वायरला विद्युत पुरवठा होण्यास अडचणी येऊ लागल्या. विद्युत पुरवठा होत नसल्याने लोकल पुढे सरकू शकत नव्हत्या. अप मार्गावरील लोकलचा वेग मंदावला. याची माहिती तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांना फिडर वायर तुटल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत ठाणे ते वाशी, नेरुळ अप मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. लोकल पुढे सरकू शकत नसल्याने डाऊन दिशेला जाणाऱ्या लोकल सेवांवरही त्याचा परिणाम झाला आणि त्या मार्गावरील लोकल फेऱ्याही बंद झाल्या. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने कामावरुन घरी परतणाऱ्यांचे मात्र हाल झाले. तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा सुरु होण्यास थोडा अवधी लागेल अशी उद्घोषणाही केली जात असल्याने प्रवाशांकडून स्थानकांबाहेर येत अन्य सेवांचा पर्याय निवडला जात होता. अनेकांनी एसटी बस आणि टीएमटी तसेच एनएमएमटीचा आधार घेतल्याने एकच गर्दी बसेसना झाली. तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी रेल्वेकडून पावणे आठ वाजल्यापासून
पॉवर ब्लॉक घेण्यात आला. रात्री ८.५१ पर्यंत चाललेल्या पॉवर ब्लॉकमध्ये काम पूर्ण करण्यात आले. लोकल सुरु होण्यास रात्री सव्वा नऊ वाजले. ओवरहेड वायरला विद्युत पुरवठा होत नसल्याची तांत्रिक समस्या सुटलेली असतानाच तांत्रिक बिघाडाची आणखी एक घटना घडली. ठाण्याला येणाऱ्या एका लोकलचा पेंटाग्राफ ऐरोलीजवळच ओवरहेड वायरमध्ये अडकला.
रात्री ९.२८ वाजता घडलेल्या या
घटनेने प्रवाशांच्या त्रासात आणखी एक भर पडली. त्यात आणखी एक तास गेला. (प्रतिनिधी)

Web Title: Thane-Vashi trans-harbor service jammed for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.