शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

गुन्हेगारी रोखण्यात राज्यात ठाणे अव्वल!

By admin | Published: January 07, 2017 3:50 AM

२०१५ च्या तुलनेत गतवर्षी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले.

ठाणे : २०१५ च्या तुलनेत गतवर्षी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले. या कामगिरीने ठाणे जिल्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी दिली. विविध गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्यासाठी आयोजित केलेल्या मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमात ते बोलत होते.ठाण्यात गत काही वर्षांपासून गुन्ह्यांचे प्रमाण सतत वाढत होते. दरवर्षी सरासरी २० टक्क्यांची वाढ त्यामध्ये होत होती. २०१६ साली मात्र हे प्रमाण २० टक्क्यांनी घटले. या वर्षात मालमत्ताचोरीचे ५ हजार ४०५ गुन्हे घडले. त्यापैकी १ हजार ७२६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमधील २६ कोटी ६९ लाख ८० हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चेन स्नॅचिंग आणि इतर गुन्ह्यांमधील २ कोटी ८३ हजार ७७ हजार ७५५ रुपयांचे सोनेचांदी फिर्यादींना परत करण्यात आले. याशिवाय, चोरी गेलेली ८ कोटी ३३ लाख ८२ हजार रुपयांची वाहनेही फिर्यादींना परत करण्यात आली. मालमत्तेशी संबंधित इतर गुन्ह्यांमधील १३ कोटी ५३ लाख २७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमालही फिर्यादींना परत करण्यात आला. एकूण २४ कोटी ७० लाख ८७ हजार १७९ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादींना देण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. पोलीस आयुक्तालयाच्या हिरवळीवर पार पडलेल्या या कार्यक्रमात ५४ फिर्यादींना ६२ लाख ६७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. चेन स्नॅचिंगचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्यासह पोलीस अधिकारी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)>सौभाग्याचे लेणे मिळालेवर्तकनगरातील प्रज्ञा राजपूत, आनंदनगरातील विद्याश्री कांबळे यांचे मंगळसूत्र २ वर्षांपूर्वी चोरी झाले होते. पोलिसांच्या प्रयत्नाने सौभाग्याचे लेणे परत मिळाल्याचा आनंद त्यांच्यासह इतर महिलांच्याही चेहऱ्यावर दिसत होता.४ वर्षांत तीन गाड्या चोरीपोखरण रोडवरील सुरेश लाड यांच्या दोन कार आणि एक मोटारसायकल गेल्या ४ वर्षांत चोरी झाल्या. सर्व गाड्या पोलिसांनी त्यांना परत दिल्या. >वर्दीतील माणुसकी मानपाड्यातील विद्यार्थी सुनील सोमवंशी याची मोटारसायकल चोरी झाल्याने त्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला होता. चितळसर पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दिल्यानंतर तेथील पोलीस उपनिरीक्षक सुर्वे यांनी स्वत:ची मोटारसायकल सुनीलला वापरण्यासाठी दिली. वर्दीतील या माणुसकीचा प्रत्यय आपणास आला असल्याचे सुनीलने यावेळी सांगितले.