ठाण्यात वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात

By Admin | Updated: August 28, 2016 10:27 IST2016-08-28T08:38:23+5:302016-08-28T10:27:57+5:30

ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली असून, एकूण २३ हजार स्पर्धक यात सहभागी झाले आहेत.

Thane Rain Marathon Tournament | ठाण्यात वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात

ठाण्यात वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात

ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. २८ -  ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली असून, एकूण २३ हजार स्पर्धक यात सहभागी झाले आहेत.  महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ झाला. एकूण १० गटात ही स्पर्धा असून, ६.५० लाख रुपयांची एकूण बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. 
 
21 कि.मी. पुरुष गट आणि 15कि.मी. महिला गट या दोन मुख्य स्पर्धेतील धावपटूंना 'टाईम चीप' देण्यात आलीआहे.पहिल्या गटातील स्पर्धा राज्यस्तरावर पुरुषांसाठी असून तिचे अंतर 21किमी असणार आहे.  
 
या गटातील विजेत्यांसाठीपहिले बक्षीस रु.75 हजार, दुसरे बक्षिस रु.50हजार, तिसरे बक्षिस रु.35 हजार, चौथे बक्षिस रु.15 हजार अशी आहेत. त्याशिवाय 5 ते 10पर्यंतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.  या गटातील स्पर्धा महापालिका भवन येथे सुरु होऊन परत महापालिका भवन येथे संपणार आहे. 
 
ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष वेगळा गट
ठाणे जिल्हयासाठी मर्यादीत ज्येष्ठनागरिक 60 वर्षावरील महिला व पुरुषांसाठीगेल्या वर्षी पासून वेगळा गट ठेवण्यात आलाअसून या गटातील पहिल्या पाच विजेत्यांसाठीरोख बक्षीसे आणि मानचिन्ह देण्यात येणारआहेत.  ज्येष्ठ नागरिकांसाठीची स्पर्धा ही महापालिका भवन ते बाटा शोरुम (नितीनकंपनी) अर्धा कि.मी. अशी होत आहे.
 
छायाचित्र - विशाल हळदे 
 

Web Title: Thane Rain Marathon Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.