ठाणे रेल्वे स्थानकात एकाला भाेसकले

By Admin | Updated: August 7, 2016 18:02 IST2016-08-07T18:02:17+5:302016-08-07T18:02:17+5:30

रागाच्या भरात बाळा गडसिंगे याने एका तरुणाला चाकूने भोसकले होते

At Thane railway station, one can get the information | ठाणे रेल्वे स्थानकात एकाला भाेसकले

ठाणे रेल्वे स्थानकात एकाला भाेसकले

ऑनलाइन लोकमत,

ठाणे, दि. 7-  रेल्वे स्थानकात पलाट क्रमांक 9 वर एक व्यक्ती आपल्या पती व दोन मुलांसोबत झोपण्यासाठी जागा शोधत होता. यावेळी त्याला दोन तरुणांनी त्या जागेवर झोपू नको ती आमची आहे, असा दम भरला. यावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात बाळा गडसिंगे याने एका तरुणाला चाकूने भोसकले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बाळा गडसिंगे पत्नी व
मुलांसह पसार झाला. मात्र ही घटना रेल्वे स्थानकात सीसीटीव्हीत कैद झाली होती. कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखा व भायखळा पोलिसांच्या विशेष कृती दलाने शोध सुरू केला. यासाठी त्यांनी ठाणे ते कल्याण दरम्यान सर्व रुग्णालये, मंदिरे, गुरुद्वारे पिंजून काढली. कारण बाळा हिंगेच्या डोक्यावर जखम होती. त्याला त्याने पट्टी मारली होती. अखेर सात दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर बाळा गडसिंगे पोलिसांनी अटक केली आहे.
बाळा गडसिंगे हा बीड जिल्ह्यातील माजगाव तालुक्यात एका गावुात राहणारा आहे. गावात अन्य लोकांशी वाद झाल्यावर त्याने त्यांना मारहाण केली हेती. त्याला अटक होईल या भितीपोटी तो पळून ठाण़े येथे आपल्या भावाच्या शोधात आला होता. त्याच्या भावाचा पत्ता त्याला सापडला नाही. म्हणून त्याने ठाणे रेल्वे स्थानकात रात्र काढण्याचा निर्णय घेतला. त्यातून हा सगळा प्रकार
घडला. गडसिंगेला हा भायखळा पोलिसांच्या ताब्यात असून त्याला ठाणे रेल्वे पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे.

Web Title: At Thane railway station, one can get the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.