शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

‘पैसे उकळण्यासाठीच ठाणे पोलिसांची कारवाई’

By admin | Updated: July 6, 2017 04:36 IST

शहर व परिसरातील पेट्रोलपंपांवर ठाण्याच्या पोलीस पथकाने केलेली कारवाई ही केवळ पैसे उकळण्यासाठी असल्याचा आरोप पेट्रोलियम डीलर्स

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद/ठाणे : शहर व परिसरातील पेट्रोलपंपांवर ठाण्याच्या पोलीस पथकाने केलेली कारवाई  ही केवळ पैसे उकळण्यासाठी असल्याचा आरोप पेट्रोलियम  डीलर्स असोसिएशनने बुधवारी  एका पत्रकार परिषदेत केला. पोलिसांच्या कारवाईमध्येच साशंकता असून, सहायक पोलीस आयुक्त दर्जावरील अधिकाऱ्यास पंप तपासणीचे अधिकार आहेत; परंतु शहरातील पंपांवर पोलीस निरीक्षकांच्या पथकाने छापे मारल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. तर इंधन घोटाळ्यामध्ये उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या डोंबिवलीच्या विवेक शेट्ये याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंधन वितरणासाठी असलेली यंत्रणा ही कंपन्यांच्या अखत्यारित असते व वजन-मापे विभागामार्फतच मोजमापाची साधने दिली जातात, त्यामुळे वितरकांना दोषी धरण्याऐवजी संबंधित कंपन्या आणि वजन-मापे विभागाला दोषी धरले पाहिजे, असे असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास म्हणाले. याप्रकरणी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना संघटनेने निवेदन दिले आहे.इंधन घोटाळ्यामध्ये उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या डोंबिवलीच्या विवेक शेट्ये याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यातील पेट्रोल पंपांना इलेक्ट्रॉनिक चिप्स त्याने विकल्याचा संशय ठाणे पोलिसांना आहे. शेट्ये याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये एमएससी केले असून, इलेक्ट्रॉनिक चिप्स त्यानेच तयार करून विकल्याचा संशय ठाणे पोलिसांना आहे. न्यायालयाने त्याला ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.कारवाई सुरूच ठेवणारपैशांसाठी नव्हे तर, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. तंत्रज्ञांकडून मीटरमध्ये फेरफार केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तसेच ही कारवाई पोलीस निरीक्षक करू शकतात, असे ठाणे क्राईम ब्रँचचे सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांनी लोकमतला सांगताना असोसिएशनने या कारवाईविरोधात कोर्टात जावे, असे आव्हान त्यांनी दिले.