ठाणे, पालघरमध्ये तीन महिन्यांत १५६ बालमृत्यू
By Admin | Updated: December 20, 2014 03:00 IST2014-12-20T03:00:00+5:302014-12-20T03:00:00+5:30
एप्रिल ते जून २०१४ कालावधीत ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये १५६ बालमृत्यू झाल्याची माहिती निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

ठाणे, पालघरमध्ये तीन महिन्यांत १५६ बालमृत्यू
ठाणे : एप्रिल ते जून २०१४ कालावधीत ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये १५६ बालमृत्यू झाल्याची माहिती निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
सर्व बालमृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर इतर आजारांमुळे झाले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत तीव्र कमी वजनाची १३ हजार ५१४, मध्यम कमी वजनाची ५६ हजार ७४६ बालके आढळून आली होती. परंतु आरोग्य यंत्रणेच्या विस्कळीत कामकाजामुळे त्यांना कुपोषित म्हणता येणार नसल्याचे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे. कुपोषणाची समस्या गंभीर बनली आहे. (प्रतिनिधी)