ठाणे महापालिकेची महासभा होणार पेपरलेस

By Admin | Updated: July 30, 2014 01:58 IST2014-07-30T01:58:13+5:302014-07-30T01:58:13+5:30

ठाणो महापालिकेने आपल्या 13क् नगरसेवकांसह महासभेला उपस्थित राहणा:या अधिका:यांना टॅब देण्याचे निश्चित केले आहे.

Thane Municipal Council will hold the papers | ठाणे महापालिकेची महासभा होणार पेपरलेस

ठाणे महापालिकेची महासभा होणार पेपरलेस

अजित मांडके - ठाणो
ठाणो महापालिकेने आपल्या 13क् नगरसेवकांसह महासभेला उपस्थित राहणा:या अधिका:यांना टॅब देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात 15क् टॅब पुढील महासभेत नगरसेवकांच्या हाती पडणार आहेत. या टॅबमध्ये पालिका एक अॅप्स समाविष्ट करणार असल्याने नगरसेवकांना एका क्लिकवर महासभेचा अजेंडा, लक्षवेधी, मिनिट्स, प्रश्नांची उत्तरे आदींची माहिती क्षणात उपलब्ध होणार असल्याने यापुढे  महासभेला येतांना त्यांना कागदपत्रंची मोठी फाईल आणण्याची गरज भासणार नाही. तसेच नगरसेवकांसह, ठाणोकर नागरीकांना सुध्दा यापुढे ऑनलाईन तक्रारी करता येणार आहेत. क्लिक करा आपली तक्रार तत्काळ महापालिकेला कळवा असा नवा फंडा या निमित्ताने पालिकेने पुढे आणला आहे. 
सध्या ठाणो महापालिकेतील महासभेचा कारभार हा मॅन्युअल पध्दतीने सुरु असून, महासभेच्या एक आठवडा आधी, नगरसेवकांना 1क्क् ते 15क् पानांचा अजेंडा, लक्षवेधी सूचना, इतिवृत्तांत आदींची भली मोठी फाईल दिली जाते. 13क् नगरसेवक असल्याने पेपरचा वापरही मोठय़ा प्रमाणात होत आहे. तसेच हा अजेंडा प्रत्येक नगरसेवकाच्या घरी अथवा ऑफीसला पोहचविण्यासाठी महापालिकेचे वाहन आणि कर्मचारी वर्ग देखील हातचे काम सोडून या कामात व्यस्त होऊन जातात. त्यानुसार प्रत्येक महासभेला लाखो रुपयांचा खर्च होत आहे.  परंतु आता मनुष्यबळासह पालिकेचा कागदपत्रंवर होणारा लाखो रुपयांचा खर्च सुध्दा हा या नव्या प्रयोगामुळे वाचणार आहे. 
पुढील महासभेत प्रत्येक नगरसेवकाच्या हाती आणि महासभेला उपस्थित असलेल्या अधिका:यांच्या हाती टॅब दिला जाणार आहे. यासाठी 44 लाखांचा खर्च आला असून आता त्यात महापालिका स्वत:चे अॅप्स डाऊनलोड करणार आहे.  हे काम खाजगी संस्थेला दिले जाणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून पुढील तीन वर्षे त्याची निगा आणि देखभाल, दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी साधारणपणो 2क् लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
 
नगरसेवकांना देणार टॅबचे प्रशिक्षण
च्टॅब कसा वापरायचा, याचे प्रशिक्षण नगरसेवकांना दिले जाणार आहे. तसेच प्रत्येकाचा इ मेल अॅड्रेस तयार केला जाणार आहे. पुढील महासभेत जरी हे टॅब हाती पडणार असले तरी प्रत्यक्षात या माध्यमातून कारभार सुरु होण्यास आणखी पाच महिन्यांचा अवधी जाणार आहे. 
 
च्टॅबद्वारे नगरसेवकांना महासभेत एखाद्या मुद्यावर मतदान करायचे झाल्यास, ती सुविधा सुध्दा यामध्ये उपलब्ध असल्याने केवळ होय किंवा नाही, यावर त्यांना क्लिक करावे लागणार आहे.  त्यामुळे एखाद्या नगरसेवकाने चुकीचे मतदान केले तरी ते गुप्त राहणार आहे. त्यामुळे महासभेत होणारे वादसुद्धा रोखण्यास मदत होणार आहे. तसेच एखाद्या मुद्यावर ऑनलाइन चर्चा करण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे. 
 
च्या सर्व यंत्रणोचे रिमोट हे सचिवांकडे असणार असून ते ज्या पद्धतीने अजेंडा, अथवा लक्षवेधी, प्रश्न उत्तरे, दुखवटा ठराव आदीं जे काही वाचतील त्यानुसार हे टॅब ऑपरेट होणार आहेत. तसेच मागील मिटिंगचे इतिवृत्त हवे असल्यास तेसुद्धा यावर उपलब्ध होणार आहेत. एखाद्या नगरसेवकाला ऑफलाइनवर जाऊन चर्चा करण्याची मुभा उपलब्ध होणार आहे. महासभेत एक मोठी स्क्रीनसुद्धा लावली जाणार असून या नव्या संकल्पनेमुळे महासभेच्या कारभारात पारदर्शकता येणार आहे. 
 
च्इंटरनेटचे कार्डसुद्धा महापालिकेकडून नगरसेवकांना पुरवले जाणार असून साधारपणो 299 रूपयांचा प्लॅन त्यामध्ये सुरवातीला दिला जाणार आहे. तसेच नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्याला जर तो टॅब हवा असेल तर सुमारे 5 हजार रुपये भरून त्याला तो टॅब आपल्याकडे ठेवण्याची मुभासुद्धा महापालिका देणार आहे. 
च्पालिकेने आपला कारभार पेपरलेस करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तसेच असा प्रयोग करणारी ठाणो महापालिका ही महाराष्ट्रातील नंबर वन महापालिका ठरणार आहे.

 

Web Title: Thane Municipal Council will hold the papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.