ठाण्यात हिवतापाची साथ
By Admin | Updated: October 9, 2015 00:59 IST2015-10-09T00:59:21+5:302015-10-09T00:59:21+5:30
जिल्ह्यात डेंग्यूपाठोपाठ आता हिवतापाची (मलेरिया) हुडहुडी वाढू लागली आहे. आतापर्यंत २ हजार ७७० रुग्णांना लागण झाली असून, सर्वाधिक रुग्ण महानगरपालिकांसह नगरपालिका क्षेत्रात आहेत.

ठाण्यात हिवतापाची साथ
- सुरेश लोखंडे, ठाणे
जिल्ह्यात डेंग्यूपाठोपाठ आता हिवतापाची (मलेरिया) हुडहुडी वाढू लागली आहे. आतापर्यंत २ हजार ७७० रुग्णांना लागण झाली असून, सर्वाधिक रुग्ण महानगरपालिकांसह नगरपालिका क्षेत्रात आहेत.
जानेवारीपासून हिवतापाचे
२ हजार ७७० रुग्ण आढळले आहेत. यामध्ये महापालिका व नगरपालिकांमध्ये सर्वाधिक २ हजार ६६ रुग्ण आहेत. सप्टेंबरमध्ये ३११ जणांना हिवताप झाला. शहरातील अस्वच्छता आणि सांडपाणी यामुळे डासांची वाढ झाली आहे. त्यासाठी धूर व कीटकनाशक फवारणीचे काम केले जात आहे. पण, आवश्यक तिथे उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे साथी डोकेदुखी ठरत आहेत.
गॅस्ट्रोसह अतिसार, हगवण, कावीळ, विषमज्वर, डेंग्यू आणि हिवताप या साथींच्या चक्रव्यूहात नागरिक व ग्रामस्थ सापडले आहेत. ठाणे, केडीएमसी, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, मीरा-भार्इंदर या महापालिकांमध्ये आतापर्यंत २,७७० हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. या महापालिकांप्रमाणेच अंबरनाथ व बदलापूर या नगरपालिकांमध्ये ८७ रुग्ण आढळले आहेत. महिनाभरात १९ रुग्ण मलेरिया विभागाने शोधले आहेत. वेळीच आळा घालण्यासाठी ९५ हजार ८३८ रुग्णांची रक्ततपासणी करण्यात आली आहे.