ठाण्यात 1 हजार 778 हंडय़ा
By Admin | Updated: August 17, 2014 01:03 IST2014-08-17T01:03:12+5:302014-08-17T01:03:12+5:30
दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून नावारूपास आलेल्या ठाणो शहरात यंदाही मुंबई आणि ठाण्यातील शे-दीडशे गोविंदा पथकांचा समूह गोपाळकाल्यानिमित्त ठाण्यात अवतरणार आहे.

ठाण्यात 1 हजार 778 हंडय़ा
>ठाणो : दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून नावारूपास आलेल्या ठाणो शहरात यंदाही मुंबई आणि ठाण्यातील शे-दीडशे गोविंदा पथकांचा समूह गोपाळकाल्यानिमित्त ठाण्यात अवतरणार आहे. यंदा या उत्सवाला वादाची किनार लागली असली तरी दहीहंडय़ांचा थरार ठाण्यात पाहण्यास मिळणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा 1 हजार 778 दहीहंडय़ा उभारण्यात येणार आहेत. या वेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात राज्य राखीव पोलीस दलाच्या 3 तुकडय़ांसह सुमारे 2 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच दहीहंडी आयोजकांना सुरक्षेबाबत काही सूचना केल्या असून काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात येणार आहेत.
ठाणो हे आता दहीहंडय़ांचे शहर म्हणून नावारूपास आले आहे. शहर नेहमीच आपली संस्कृ ती आणि परंपरा जपत आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून दहीहंडय़ांना ग्लोबल स्वरूप आल्याने शहरातील प्रत्येक नाक्यावर आता हंडय़ाच हंडय़ा दिसू लागल्या आहेत. विशेष म्हणजे राजकीय पक्षांनीही या उत्सवात रंग भरून प्रत्येक राजकीय पक्षाच्या दोन-तीन हंडय़ा दिसणार आहेत.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक 392 आणि खाजगी 1386 दहीकाला उत्सव साजरे केले जाणार आहेत. तर 1क्8 ठिकाणी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.
कल्याणात सर्वाधिक 32 ठिकाणी जन्मोत्सव होणार असून त्यापाठोपाठ वागळे इस्टेट - 28, भिवंडी - 23, ठाणो - 15 आणि उल्हासनगर - 1क् येथेही जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच वागळे इस्टेट परिमंडळात सर्वात जास्त 2क् गोविंदा पथके असून येथून 33 मिरवणुका निघतात. त्यापाठोपाठ भिवंडीत 27 गोविंदा पथके आणि तेथून 27 मिरवणुका निघत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सोमवारी गोविंदा पथकांची मोठी रेलचेल असणार आहे. तसेच गोविंदा पथकांचा थरार पाहण्यासाठी सामान्य लोकही मोठय़ा प्रमाणात गर्दी करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजकंटकांकडून घातपात करण्याची शक्यता आहे. तसेच गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरटय़ांकडूनही महिलांना लक्ष्य केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
दहीहंडीच्या पाश्र्वभूमीवर ठाणो पोलीस आयुक्तालयात 3 सहायक पोलीस आयुक्त, 16 पोलीस निरीक्षक, 75 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 1क्37 पुरुष पोलीस, 2क्6 महिला पोलिसांसह 425 होमगार्ड (पुरुष-महिला), 53 वॉकी-टॉकी, 35 वायरलेस संच, श्वानपथक आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या 3 तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
शहरातील दहीकाला उत्सव
परिमंडळसार्वजनिकखाजगीजन्मोत्सव
ठाणो9क्25915
भिवंडी5621क्23
कल्याण7529532
उल्हासनगर8535क्1क्
वागळे इस्टेट8627128
एकूण3921,3861क्8