ठाणे जिल्ह्यात २०४ नवे रुग्ण; तर २७ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 21:12 IST2021-06-19T21:11:24+5:302021-06-19T21:12:06+5:30

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

thane district reports 204 new patients and 27 patients died due to corona | ठाणे जिल्ह्यात २०४ नवे रुग्ण; तर २७ रुग्णांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात २०४ नवे रुग्ण; तर २७ रुग्णांचा मृत्यू

ठाणे :ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २७ हजार ६०४ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ४८९  झाली आहे. 

ठाणे शहर परिसरात ५८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३२ हजार २१४  झाली आहे. शहरात १ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ९६४ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत ३२ रुग्णांची वाढ झाली असून ३  मृत्यूची नोंद आहे. नवी मुंबईत ३१ रुग्णांची वाढ झाली असून ३ मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ५ रुग्ण सापडले असून  एका मृत्यूची नोंद आहे. 

भिवंडीत ३ बाधीत असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये ३० रुग्ण आढळले असून एक मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ५ रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये १५ रुग्णांची नोंद असून २०  मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २५ नवे रुग्ण वाढले असून  एका मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३८ हजार ६९५ झाली असून आतापर्यंत ११६५ मृत्यूंची नोंद आहे.
 

Web Title: thane district reports 204 new patients and 27 patients died due to corona