ठाणे जिल्हाप्रमुखांच्या खेळीने अंबरनाथमध्ये पुन्हा भगवा

By Admin | Updated: April 24, 2015 01:34 IST2015-04-24T01:34:06+5:302015-04-24T01:34:06+5:30

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकांत शिवसेनेने बाजी मारली. पालकमंत्री आणि जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांची व्यूहरचना

Thane district chief again saffron again in Ambernath | ठाणे जिल्हाप्रमुखांच्या खेळीने अंबरनाथमध्ये पुन्हा भगवा

ठाणे जिल्हाप्रमुखांच्या खेळीने अंबरनाथमध्ये पुन्हा भगवा

पंकज पाटील
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकांत शिवसेनेने बाजी मारली. पालकमंत्री आणि जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांची व्यूहरचना यामागे आहे. आधी प्रतिपक्षातील मातब्बर उमेदवार आपल्या पक्षात आणायचे, त्यांच्याशी एकनिष्ठ असणारी प्रतिपक्षांची व्होट बँक फोडून दुसरीकडे आपली व्होट बँक मजबूत करायची व निवडणूक स्वबळावरच लढवायची, ही त्यांची खेळी त्यांनी यशस्वी करून दाखविली. अंबरनाथमध्ये २९ जागा बहुमतासाठी आवश्यक असून, सेनेने २६ जागा मिळविल्या. भाजपा - १०, काँग्रेस - ८, राष्ट्रवादी - ५, मनसे - २ तर ६ ठिकाणी अपक्ष विजयी झाले आहेत. मनसे अथवा अपक्षांना हाताशी धरून सेनेला बहुमताची २९ संंख्या सहज पार करता येईल.

Web Title: Thane district chief again saffron again in Ambernath