ठाणे चेकमेट दरोडा : केवळ 18 पोलिसांच्या सत्कारामुळे इतरांमध्ये नाराजी
By Admin | Updated: July 21, 2016 23:10 IST2016-07-21T22:20:24+5:302016-07-21T23:10:48+5:30
येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. या दरोड्यातील आकाश चव्हाण, किरण साळुंखे आणि अमोल कार्ले आदी १६ जणांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून लुटीतील दहा कोटी आठ लाखांची

ठाणे चेकमेट दरोडा : केवळ 18 पोलिसांच्या सत्कारामुळे इतरांमध्ये नाराजी
>- जितेंद्र कालेकर
ठाणे : चेकमेट सव्र्हिसेस प्रा.लि. या दरोडय़ातील 16 आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून लुटीतील 10 कोटी आठ लाख रुपये हस्तगत करणा-या 18 अधिकारी, कर्मचा-यांचा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मात्र, दरोडय़ाची पाळेमुळे खणून काढण्यात सुमारे 60 ते 70 जणांचा सहभाग असताना काही ठरावीक अधिकारी, कर्मचा-यांचा गौरव केला गेल्याने नाराजीचा सूरही उमटत आहे.
ठाणो शहर पोलिसांच्या ‘मंथन सभागृहात’ बुधवारी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत हा छोटेखानी सत्कार सोहळा पार पडला. या दरोडय़ाच्या तपासात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यासह गुन्हे अन्वेषण विभागाची पाच पथके कार्यरत होती. दरोडय़ातील सूत्रधारासह 16 आरोपींना पकडण्याबरोबरच लुटीतील 11 कोटींपैकी 10 कोटी आठ लाख रुपये अल्पावधीत मिळवण्यातही पोलिसांना यश आले. रोकड लुटल्यानंतर त्यापैकी 90 टक्के रक्कम परत मिळवणो हा ठाणो पोलिसांचा विक्रम आहे. सुरुवातीला चेकमेट कंपनीने नऊ कोटी 16 लाखांच्या लुटीची नोंद केली होती. प्रत्यक्षात त्यापेक्षा एक कोटी रुपये अधिक हस्तगत केल्यानंतर चेकमेटने 11 कोटी सात लाखांची लूट झाल्याचे कबूल केले.
यांचा झाला सत्कार...
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणोरे, सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन कदम, निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती, उपनिरीक्षक अविनाश महाजन, रोशन देवरे, हवालदार नितीन ओवळेकर, सुरेश मोरे, वागळे इस्टेट युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर, निरीक्षक मदन बल्लाळ, सहायक पोलीस निरीक्षक विजय दळवी, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, हवालदार विजयकुमार गो:हे, युनिट-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कु-हाडे, मुंब्रा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर पाटील आणि भिवंडी युनिट निरीक्षक शीतल राऊत आदींचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अत्यंत कमी वेळेत मोठय़ा कौशल्याने या गुन्ह्याची उकल करून संपूर्ण राज्यातील पोलिसांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी ठाणो पोलिसांनी केल्याचे गौरवोद्गार या वेळी आयुक्तांनी काढले.
‘‘प्रत्येक टीमच्या वतीने अग्रभागी असलेल्या अधिकारी, कर्मचा:यांचा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार केला आहे. गुन्हे आढावा बैठकीत संपूर्ण टीमचा सत्कार करणोही शक्य नसते. परंतु, उर्वरित कर्मचा:यांचाही कालांतराने गौरव करण्यात येईल.’’
आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर
‘‘गुन्ह्याचा तपास हे टीमवर्क असल्यामुळे सर्वानीच कौशल्य पणाला लावून या प्रकरणाचा छडा लावला आहे. त्यामुळे सर्वाचीच कामगिरी कौतुकास्पद आहे. सत्काराबाबत नेमके काय झाले, याची माहिती घेऊन सर्वानाच न्याय देण्यात येईल.’’
- मकरंद रानडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर