ठाण्यात मुलानेच केली आई-वडिलांची हत्या
By Admin | Updated: March 7, 2016 12:23 IST2016-03-07T11:03:21+5:302016-03-07T12:23:17+5:30
वाशिंद येथे मुलानेच आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिंद येथील मारुती मंदिराजवळील ही घटना घडली आहे

ठाण्यात मुलानेच केली आई-वडिलांची हत्या
>
ऑनलाइन लोकमत -
ठाणे, दि. ७ - वाशिंद येथे मुलानेच आई - वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिंद येथील मारुती मंदिराजवळील ही घटना घडली आहे. सागर सुरेश दिनकर या २३ वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांसह सावत्र आईची हत्या केली आहे. चाकूने वार करुन ही हत्या करण्यात आली आहे. सावत्र आई आणली म्हणून सागरच्या मनात राग होता, त्यावरुन घरात रोज भांडणेही होत होती. रोजच्या भांडणाला कंटाळूनच आपण ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. वाशिंद पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या चौकशी करत आहेत.